Goa Drug Case: आधीच ‘एनडीपीएस’ गुन्ह्यात जामिनावर असणारा 'पॅट्रिक' पुन्हा अडकला ड्रग्ज व्यवहारात; कोर्टाने फेटाळला जामीन

Patrick Bah Bail Rejected: पॅट्रिक बाह या विदेशी आरोपीचा उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
Patrick Bah Bail Rejected
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘एनडीपीएस’ गुन्ह्यात जामिनावर असताना पुन्हा अमली पदार्थ व्यवहारांत अडकल्याने पॅट्रिक बाह या विदेशी आरोपीचा उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष फौजदारी प्रकरण (एनडीपीएस) अन्वये २४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिसांनी आरोपीकडून १८ बहुरंगी गोळ्या (एक्स्टसी – ७.६८ ग्रॅम) व मेथअँफेटामाइन २३.९८ ग्रॅम असा एकूण ३.२० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

पॅट्रिकला यापूर्वीही ‘एएनसी’ ने अशा गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. त्याचा १ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र त्याला पुन्हा अमली पदार्थ गुन्ह्यात न अडकण्याची अट घालण्यात आली होती. आरोपीने (Accused) या अटींचे उल्लंघन केले. मागील आदेशातील अटीचा भंग केल्याने त्याला जामीन देता येणार नाही, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजया आंब्रे यांनी या आदेशात नमूद केले.

Patrick Bah Bail Rejected
Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

दरम्यान, सरकारी पक्षाने जामिनास तीव्र विरोध दर्शविताना सांगितले की, आरोपीविरुद्ध आणखी एक ‘एनडीपीएस’ प्रकरण नोंद आहे. त्याच्याकडे वैध व्हिसा नाही, तसेच स्थानिक पत्ता वा उदरनिर्वाहाचे साधनही सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे तो जामिनावर सुटल्यास फरार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बचाव पक्षाने आरोपीकडून जप्त झालेले प्रमाण ‘परिवर्ती प्रमाण’ असल्याने जामीन मिळायला हवा, असा आग्रह धरला. तथापि, न्यायालयाने (Court) आधीच्या जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याने त्याला सर्वाधिक महत्त्व देत बचावाचा दावा फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com