Drugs Seizes At Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर तब्बल 5 कोटींचे कोकेन जप्त

एनसीबीच्या गोवा विभागाची कारवाई
NCB seizes 1 kg of cocaine in Goa
NCB seizes 1 kg of cocaine in Goa Dainik Gomantak

Drugs seizes At Dabolim Airport: एनसीबीच्या गोवा विभागाने तब्बल 5 कोटींचे कोकेन अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई आज एनसीबीने दाबोळी विमानतळावर केली. याप्रकरणी गोवा आणि दिल्ली येथे दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दाबोळी विमानतळावरी कस्टम्स अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. कस्टम्स अधिकाऱ्यांनी विमानतळावर जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) येथून दुबईमार्गे भारतात आलेल्या एका केनियन नागरिकाला संशय आल्याने तपासणीसाठी थांबविले.

NCB seizes 1 kg of cocaine in Goa
Dhavali Scrapyard Fire : ढवळीत भंगारअड्ड्यात अग्नितांडव, पाहा क्षणचित्रे

विमानतळावर त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रॉली बॅगच्या छोट्या तळामध्ये लपवून ठेवलेली दोन पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये 1.009 किलो कोकेन आढळून आले आहे. या कोकेनची किंमत ही सुमारे 5 कोटी रुपये एवढी आहे.

याबाबतची माहिती एनसीबीच्या गोवा विभागाला देण्यात आली. याप्रकरणी सॅम्युएल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

संशयिताची कसून चौकशी केली असता ही कोकेनची पाकिटे नवी दिल्लीत पोहचवली जाणार होती. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित जेम्स ईसी या आणखी एका संशयिताला शुक्रवारी दिल्लीत अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com