Goa Student: ‘जीईई मेन 2024’ परीक्षेत नाविन्य देसाई राज्यात प्रथम

Goa Student: कुजिरातील मुष्टिफंड आर्यान अव्वल: देशातील 23 जणांचा 100 एनटीए स्कोअर
Goa Student
Goa StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Student: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या पहिल्या सत्रातील ‘जेईई मेन 2024’ परीक्षेचा निकाल मंगळवारी पहाटे जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 23 विद्यार्थ्यांनी 100 एनटीए स्कोअर मिळविला आहे.

यात गोव्यातील अंबाजी - फातोर्डा येथील नाविन्य देसाई याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तो मुष्‍टिफंड आर्यान उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव जाहीर करणे सुरू झाल्यापासून राज्यात मुष्टिफंड आर्यनच्या विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान राखले आहे.

यंदाच्या परीक्षेत मुष्टिफंडमधील नाविन्य देसाई (९९.८८ %), जी. के. लोकेश (९९.७५%), त्रिशा पै वेर्णेकर (९९.०३%), श्‍याम स्वामीनाथन (९९.०१%), रायीरथ कामत (९८.८७७२९३०), अर्जुन बिनो नायर (९८.६०%) आणि नील तावरो (९८.०९) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

Goa Student
Goa Mining Case: मये गावातील खनिज वाहतूक अखेर बंद

‘एनटीए’च्या वतीने ‘जेईई मेन’ची परीक्षा दोन सत्रात घेतली जाते. त्यानुसार पहिल्या सत्रातील पेपर एक (बी.ई./बी.टेक) २७, २९, ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या कालावधीत झाला. देशातील १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ११ लाख ७० हजार ४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा आसामी, बंगाली, जीईई परीक्षेत नाविन्य देसाई राज्यात प्रथम

इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये घेण्यात आली. पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा देश-परदेशातील एकूण २९१ शहरांमधील ५४४ केंद्रांवर घेण्यात आली. परदेशातील २१ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली, बी. आर्च आणि बी. प्लॅनिंगसाठी जेईई मेन अंतर्गत पेपर दोन ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com