Goa Politics: 'ते केवळ नशिबानेच आमदार...'; कुतिन्हो आणि तुयेकर यांच्यात जुंपली

Navelim MLA Ullas Tuyekar: नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर व समाज कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यात पावसाळ्यातील कामांवरून शीतयुद्ध सुरू झाले आहे.
Goa Politics: 'ते केवळ नशिबानेच आमदार...';  कुतिन्हो आणि तुयेकर यांच्यात जुंपली
navelim MLA ullas tuyekar and social activist Pratima Coutinho Dainik Gomantak
Published on
Updated on

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर व समाज कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यात पावसाळ्यातील कामांवरून शीतयुद्ध सुरू झाले आहे. प्रतिमा कुतिन्हो यांनी उल्हासवर हल्ला करताना सांगितले, की ‘ते केवळ नशिबानेच आमदार झाले. ते कधी नावेली व नावेलीकरांसाठी नव्हते व नाहीत. पुढील निवडणुकीत निवडून येईल याची त्यांना स्वतःलाच खात्री नाही.

नावेलीत गटारे, नाले साफ केले नसल्याने सर्वत्र पाणी साचले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. असे असतानासुद्धा आपली जबाबदारी नसल्याचे सांगून ही कामे पंचायतीने करणे आवश्यक आहे, असे ते सांगतात. यातून त्यांच्याच पंचायतीतील सरपंच व पंच त्यांच्यावर नाराज होतील असेही कुतिन्हो यांनी म्हटले आहे. आमदार तुयेकर यांना महिलांचा आदर करता येत नाही, म्हणूनच त्यांच्या तोंडून अशी भाषा येते, असेही त्या म्हणाल्या.

Goa Politics: 'ते केवळ नशिबानेच आमदार...';  कुतिन्हो आणि तुयेकर यांच्यात जुंपली
Goa Politics: 'कामतांचे वय झालंय, त्यांनी डोकं तपासून घ्यावं'; माजी मुख्यमंत्री - सरदेसाई यांच्यातील वाद शिगेला

यावर आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले, की केवळ फोटो, व्हिडिओ काढले व सोशल मीडियावर टाकले म्हणून काम होत नाही. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करणे आवश्यक असते. आम्ही सर्व पंचायतींच्या पावसाळापूर्व बैठका घेऊन कामांचा आढावा घेतला होता. नाले, गटारे स्वच्छ केली होती. आमचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viresh Borkar Challenges Manoj Parab
Margao Municipal Council Garbage Tender Scam
 Goa Electric Bus
Car Chase
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com