Nave Utsav 2024: ..आता 'भातकापणीला' सुरवात! सातेरी केळबाई देवस्थानचा 'नवे उत्सव' उत्साहात साजरा

Sateri Kelbai Temple Ladfem: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला लाडफे येथील सातेरी केळबाई देवस्थानचा पारंपरिक 'नवे उत्सव' विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Sateri Kelbai Temple Ladfem: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला लाडफे येथील सातेरी केळबाई देवस्थानचा पारंपरिक 'नवे उत्सव' शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Sateri Kelbai Temple Ladfem | Nave Utsav Dainik Gomantak
Published on
Updated on

Shri Sateri Kelbaii Devsthan Ladfe Nave Utsav 2024

डिचोली: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला लाडफे येथील सातेरी केळबाई देवस्थानचा पारंपरिक 'नवे उत्सव' शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदाचे मानकरी, देवस्थानचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ वाजतगाजत येथील देवाच्या शेतात गेले. शेतात भातपिकाची विधिवत पूजा करण्यात आली. नंतर भाताची कणसे कापून ती वाजतगाजत मंदिरात आणली. ही कणसे परंपरेनुसार देवतांना अर्पण करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी कणसे आपापल्या घरी नेऊन घरोघरी विधिवत नवे केले.

Sateri Kelbai Temple Ladfem: शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला लाडफे येथील सातेरी केळबाई देवस्थानचा पारंपरिक 'नवे उत्सव' शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Nave Utsav: ४०० वर्षांची परंपरा लाभलेला 'नवे उत्सव' उत्साहात साजरा! मये, वायंगिणी आणि डिचोली ग्रामस्थांचा सहभाग

या उत्सवात देवस्थान समिती तसेच नागरिक सहभागी झाले होते. देवदेवतांना भाताचे कणीस अर्पण करून 'नवे' उत्सव झाल्याने गावातील भात कापणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या नवे कार्यक्रमाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विष्णू मळीक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com