
नावशी येथे मरिना प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाला पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नाही. केवळ गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकऱणाची परवानगी घेऊन या प्रकल्पाचे काम करता येईल, असे केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने कळविले आहे.
या प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला मिळवण्यासाठी मंत्रालयाकडे अर्ज केल्यानंतर तो विचारार्थ तज्ज्ञ मूल्यांकन समितीकडे सोपवला होता. या महिन्यात झालेल्या समितीच्या बैठकीसमोर मरिना प्रकल्पाची प्रवर्तक कंपनी असलेल्या कार्गवाल कन्स्ट्रक्शन कंपनीने सादरीकरण केले होते.
त्यांच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याने पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नाही. त्यांचा मुद्दा तज्ज्ञ मूल्यांकन समितीने ग्राह्य धरला आणि तसे मंत्रालयाला कळवले आहे.
त्यानंतर मंत्रालयाकडून कंपनीला कळवण्यात आले आहे. मरिना प्रकल्पामुळे मच्छीमारांवर गदा येणार आणि शांत सुंदर अशा नावशी बेटाची ओळख पुसली जाणार, असा दावा करून या प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
त्यानंतर हा प्रकल्प विस्मृतीत गेल्यातच जमा होता. ‘आहोय मरिना’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मरिना प्रकल्प हा मुख्यत: पर्यटनासाठीच्या नौका, यॉट आणि लहान जहाजे यांच्या पार्किंगची सुविधा देणारी व्यवस्था आहे.
दरम्यान, जनता हा प्रकल्प कदापि स्वीकारणार नाही. हा प्रकल्प परत लादण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे सामाजिक कार्यकर्ते रामराव वाघ यांनी म्हटले आहे.
प्रदूषण नाहीच!
या प्रकल्पासाठी पर्यावरण दाखला मिळवण्यासाठी मंत्रालयाकडे अर्ज केल्यानंतर तो विचारार्थ तज्ज्ञ मूल्यांकन समितीकडे सोपवला होता. समितीच्या बैठकीत मरिना प्रकल्पाची कंपनी कार्गवाल कन्स्ट्रक्शनने सादरीकरण केले होते.
त्यांच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याने पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नाही. त्यांचा मुद्दा तज्ज्ञ मूल्यांकन समितीने ग्राह्य धरला.
मरिना प्रकल्पाची खासियत
०५ हेक्टर जागा भराव घालून तयार करणार.
15 हेक्टर जागेत प्रकल्प
१० हेक्टर जागा पाण्याखाली
२३९ नौका एकाचवेळी नांगरण्याची जेटीवर सोय.
५० मीटरपेक्षा जास्त लांबीच्या दोन यॉटही नांगरता येणार.
जहाज दुरुस्तीचीही सोय.
सुट्टीशी संबंधित सर्व सोयी सुविधा. उदा. राहणे, पोहणे, खेळणे, खरेदी आणि व्यवसाय/सांस्कृतिक संमेलने आणि सण साजरे करण्याचीही सोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.