
Dweep Parichay Yatra :म्हापसा ता राज्यपाल पी. एस. श्रीधरम पिल्लई यांनी गुरुवारी (ता. १९) ‘राण्याचे जुवे’ तसेच ‘खोर्जुवे बेटा’स भेट दिली.
‘द्वीप परिचय यात्रे’निमित्त राज्यपालांनी रेवोडामधील चर्च तसेच नादोडामधील माऊली देवस्थान व विशेषतः ‘राण्याचे जुवे बेटा’चा इतिहास जाणून घेतला.
राज्यपालांनी भेटीदरम्यान सांगितले की, गोव्यातील संस्कृती व वारसाविषयी पर्यटक, भारतवासीयांना तसेच जगाला माहिती मिळावी यासाठी गोवा राजभवनकडून हा दौरा घडविला जातो.
मध्यंतरी, ४३ पंचायतींना गोवा राजभवनाकडून भेट दिल्यानंतर या गावांच्या वतनावर पुस्तके प्रकाशित झाली. त्याचप्रमाणे, आता गोव्यातील सात बेटांची माहिती मिळावी यासाठी मी बेटांना भेट देतोय.
या सात बेटांविषयी संकलित माहिती देणाऱ्या पुस्तकाचे नाव ‘स्वर्गीय बेट’ (हेव्हनली आयलँड्स) असेल आणि लवकरच त्याचे प्रकाशन केले जाईल, असे सूतोवाच राज्यापलांनी केले.
या दौऱ्यावेळी राज्यपाल यांच्यासोबत मंत्री नीळकंठ हळर्णकर तसेच स्थानिक पंचायतींचे पंच सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
राणे कुटुंबीयांच्या पोर्तुगीजकालीन घरास भेट
राज्यपालांनी जुवे बेटावरील राणे कुटुंबीयांच्या पोर्तुगीजकालीन घरास भेट दिली. तिथे कुटुंबीयांनी आजवर मराठा काळातील जपून ठेवलेल्या शस्त्रागाराची त्यांनी आवर्जून माहिती घेतली.
यावेळी राजसिंग राणे, महेश राणे व त्यांचे इतर घरचे सदस्य जातीने पारंपरिक वेशात हजर होते.
राणे घराण्याचे पुरोहित जगन्नाथ साठे तसेच गणेशमूर्तीकार कारागिर श्रीकृष्ण धुमाळ यांचा शाल व श्रीफळ देऊन राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राणे कुटुंबीयांकडून राज्यपाल तसेच त्यांच्या पत्नीची ओटी भरण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.