'नागेश महालक्ष्मी' संस्‍थेकडून संस्‍कृतीचे संवर्धन!

Ponda: नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज संस्‍थेला सर्व मान्‍यवरांकडून शुभेच्‍छा देण्यात आल्या.
Rajiv Gandhi Kala Mandir
Rajiv Gandhi Kala MandirDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda: पोर्तुगीज काळात दंडेलशाहीमुळे नाटके बंद केली जायची. पण नागेश महालक्ष्मी प्रासादिकसारख्या नाट्यमंडळांनी कलेची पाठराखण करताना गोवा मुक्तीच्या संग्रामात सहभाग दर्शवला. आज या संस्था कार्यकर्त्यांच्या भक्कम बळावर उभ्या आहेत आणि नवनवीन कलाकार घडवत आहेत ही कलेच्या प्रांगणातील मोठी उपलब्धी असल्याचे उद्‌गार नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज संस्‍थेचे कार्याध्यक्ष तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात काल रविवारी नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज संस्‍थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता समारोपात ढवळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध नाट्यसमीक्षक जनार्दन वेर्लेकर, श्री महालक्ष्मी संस्थानचे अध्यक्ष हर्षद कामत, नागेश महालक्ष्मी नाट्यसमाजाचे अध्यक्ष अजित केरकर व सचिव अरुण काळे आदी उपस्थित होते.

Rajiv Gandhi Kala Mandir
Marathi Literature : अहंकारामुळे मराठी साहित्याचे नुकसान

जनार्दन वेर्लेकर म्हणाले की, एखादी संस्था पंचाहत्तर वर्षे पूर्ण करते ही विलक्षण बाब आहे. कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीमुळेच हे शक्य झाले. भारतीय संस्कृतीची मुळे खोलवर रुजली आहेत. नाट्यकला गोव्यात बहरली. त्यामुळेच नागेश महालक्ष्मीसारखी संस्था फळरूपाला आली असे सांगून त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

हर्षद कामत यांनीही विचार मांडताना संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन अशोक नाईक यांनी केले. स्वागत व प्रास्तविक अजित केरकर यांनी तर अरुण काळे यांनी आभार मानले.

Rajiv Gandhi Kala Mandir
Goa Accident Case| अटल सेतू पुलावर अपघातांची मालिका सुरुच!

नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज संस्‍थेच्‍या वाटचालीत योगदान दिलेल्या 57 कलाकारांचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्‍यात काही बालकलाकारांचाही समावेश होता. या कार्यक्रमानंतर संगीत ‘रणदुंदुभी’ नाट्यप्रयोग सादर करण्‍यात आला. त्‍यास नाट्यरसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com