Kiteboarding: काईटबोर्डिंगमध्ये गोव्याची रजनी, अर्जुन दावेदार; मांद्रे समुद्रात रंगणार स्पर्धा

प्रीमियर काईटबोर्डिंग असोसिएशनतर्फे स्पर्धा घेण्यात येत आहे.
Kiteboarding
KiteboardingDainik Gomantak
Published on
Updated on

National Kiteboarding championship: गतविजेते गोव्याची केओना रजनी आणि अर्जुन मोथा भारतीय राष्ट्रीय काईटबोर्डिंग स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात विजेतेपदासाठी दावेदार असतील. स्पर्धा शुक्रवारपासून (ता. 21) मांद्रे समुद्रात होईल.

प्रीमियर काईटबोर्डिंग असोसिएशनतर्फे स्पर्धा घेण्यात येत आहे. 24 एप्रिल रोजी स्पर्धेचा समारोप होईल. ‘‘देशभरातील 15 पेक्षा स्पर्धकांनी स्पर्धेतील सहभाग पक्का केला आहे, त्यापैकी चार जण गोव्यातील आहे. गुरुवारपर्यंत आणखी प्रवेशिका अपेक्षित आहेत,’’ असे स्पर्धेची माहिती देताना प्रीमियर काईटबोर्डिंग असोसिएशनचे सचिव डेरिक मिनेझिस यांनी सांगितले.

Kiteboarding
Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक! जीनोसमोर साळगावकर क्लबचे आव्हान

पॅरिसमध्ये 2024 साली होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत फॉर्म्युला ऑलिंपिक काईट गटाचा समावेश आहे. या गटातील शर्यती प्रथमच गोव्यात होतील, असे डेरिक यांनी नमूद केले. ऑलिंपिक काईट फॉलिंग गटात आर्मी यॉटिंग नोडच्या सेलर्सचा दबदबा राहण्याचा अंदाज डेरिक यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील शर्यती सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा या कालावधीत होतील. समुद्रातील या शर्यतीत स्पर्धकांच्या सुरक्षेची जबाबदार ‘दृष्टी’ या संस्थेवर राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com