सरकारच्या हाकेने हर घर तिरंग्याला जनतेने उदंड प्रतिसाद देत आपल्या घरावर तिरंगा फडकावला. तसेच आता राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी सरकारने घरा घरात दिलेले राष्ट्रध्वज परत गोळा करून त्यांचे जतन करावे अशा आशयाचे निवेदन मुरगावतील समाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी (Shankar Polji) व त्यांच्या मित्रांनी बायणा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
देशात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा फडकवण्याचे केंद्र सरकारच्या आदेशानुसार गोव्यात हर घर तिरंग्याला जनतेने उदंड प्रतिसाद देत आपल्या घरावर तिरंगा फडकावला. मात्र आज तीन दिवस उलटले तरी घरावर तसेच इतर ठिकाणी फडकावण्यात आलेले तिरंगे तसेच्या तसेच फडकत असलेले दिसत आहे. दरम्यान याविषयी समाजकार्यकर्ते शंकर पोळजी यांनी तिरंग्याचा अनादर टाळण्यासाठी, तसेच तिरंगा चुकीच्या ठिकाणी पडू नये यासारखे पुढील वाईट परिणाम टाळण्यासाठी, सरकारने ज्या पद्धतीने लोकांना घरा घरात तिरंग्याचे वाटप केले आहे ते तिरंगे परत ताब्यात घेऊन ते सरकारी तिजोरी जमा करावे अशी मागणी केली आहे.
कारण आज नजर पडते तिथे तिरंगा आडवा झालेला, धूळ खात पडलेला दिसतो. सरकारची संकल्पना बरी आहे पण आता तिरंग्याचा अवमान रोखण्यासाठी पालिका, उपजिल्हाधिकारी कार्यालय, नगरसेवक, स्थानीक आमदार, मंत्री यांनी ज्या ज्या घरात तिरंगे दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन ते परत ताब्यात घ्यावे व तिरंग्याचा अवमान रोखावा अशा आशयाचे निवेदन समाज कार्यकर्ते शंकर पोळजी व त्यांच्या मित्रांनी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.