Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Ashtami Jatra Goa: नार्वे येथील पंचगंगेच्या तीरावर भरणारी अष्टमीची जत्रा गोमंतकासह शेजारच्या राज्यांमध्‍ये प्रसिद्ध आहे. यंदा अष्टमीच्या दिवशी पावसाने कहर केला होता.
Ashtami Jatra Goa
Ashtami Jatra GoaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नार्वे येथील प्रसिद्ध अष्टमीची जत्रा काल शुक्रवारी (ता. १५) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली.

नार्वे येथील पंचगंगेच्या तीरावर भरणारी अष्टमीची जत्रा गोमंतकासह शेजारच्या राज्यांमध्‍ये प्रसिद्ध आहे. यंदा अष्टमीच्या दिवशी पावसाने कहर केला होता. दुपारी तर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र त्याची पर्वा न करता हजारो भाविकांनी पंचगंगेच्या तीरावर गर्दी करून अष्टमीचा आनंद द्विगुणित केला. वेगवेगळ्या भागातून भाविकांनी पंचगंगेच्या तीरावर गर्दी केली होती. त्‍यांनी अभिषेकादी पारंपरिक विधी केले.

Ashtami Jatra Goa
Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

स्थानापन्न झालेल्या विविध भागांतील पालखींमधील देवतांचे दर्शन घेऊन भाविकांनी सेवा अर्पण केली. चतुर्थीसाठी लागणाऱ्या वस्तूंची फेरी हे नार्वे येथील अष्टमीचे वैशिष्ट्य. यंदाही लाकडी माटोळी, पाट, चौरंग आदी लाकडी वस्तूंसह खाजे, चणे आणि अन्य वस्तूंच्या स्टॉल्‍ससह फेरी भरली होती. या फेरीलाही भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Ashtami Jatra Goa
Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

केंद्रीय मंत्र्यांसह खासदार, आमदारांची उपस्‍थिती

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी नार्वे येथील अष्टमीच्या जत्रेला उपस्थिती लावून देवदेवतांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नदीकिनारी शुचिर्भूत होऊन देवदेवतांचे आशीर्वाद घेतले. प्रेमेंद्र शेट यांनी पंचगंगेच्या तीरावर सपत्नीक अभिषेकही केला. यावेळी नार्वेचे सरपंच सिद्धेश पार्सेकर आणि पंचसदस्य उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांनी अष्टमीच्या जत्रेचे महत्त्‍व सांगून भाविकांना शुभेच्छा दिल्या. पोलिस वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com