Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

Goa women missing news: नार्वे आणि हातुर्ली येथील दोन महिला अचानक बेपत्ता झाल्याने मये भागात खळबळ निर्माण झाली आहे. बेपत्ता असलेल्या या महिलांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
Goa women missing news
Goa women missing newsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या सव्वा महिन्यात नार्वे आणि हातुर्ली येथील मिळून दोन महिला अचानक बेपत्ता झाल्याने मये भागात खळबळ निर्माण झाली आहे. बेपत्ता असलेल्या या महिलांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी आता अनेक तर्कवितर्क पुढे येत असून, घातपाताचा संशयही वर्तविण्यात येत आहे.

सरस्वती गेल्या कुठे?

देऊळवाडा-नार्वे येथील सरस्वती आनंद नार्वेकर (वय ६२) गेल्या ५ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्या आहेत. तेव्हापासून या महिलेचा शोध सुरु आहे. त्या बेपत्ता झाल्याचे कळताच कुटुंबियांनी रानावनात तसेच संशयास्पद ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही सरस्वती या महिलेचा शोध लागलेला नाही. पोलिसांकडूनही त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्या सापडू शकल्या नाहीत.

Goa women missing news
Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

चंद्रिका बाजारासाठी गेल्या होत्या...

हातुर्ली-मये येथील चंद्रिका (मंगला) फोंडू शिरोडकर (वय ७०) गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी डिचोली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आली आहे. त्या बुधवारी (ता. १०) डिचोलीच्या आठवडी बाजारासाठी घराबाहेर पडल्या होत्या.

Goa women missing news
Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

त्या घरी परतलेल्याच नाहीत. दरम्यान, चंद्रिका या दोडामार्गच्या बाजूने गेल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी दोडामार्गातही शोध घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com