Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Odisha Shocking Incident: कंधमाल जिल्ह्यात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अज्ञातांनी 'फेव्हिक्विक' टाकले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना आपले डोळे उघडणे कठीण झाले.
Odisha Shocking Incident
Odisha school incidentDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha School Incident: ओडिशा राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कंधमाल जिल्ह्यात एका शाळेच्या हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अज्ञातांनी 'फेव्हिक्विक' टाकले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना आपले डोळे उघडणे कठीण झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

पीडित विद्यार्थ्यांची स्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कंधमाल जिल्ह्यातील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेच्या हॉस्टेलमध्ये घडली. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, रात्रीच्या वेळी काही विद्यार्थी आपापल्या हॉस्टेलच्या रुममध्ये गाढ झोपले होते. याचवेळी काही अन्य विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्याच वर्गमित्रांनी त्यांच्या डोळ्यांत 'फेव्हिक्विक' टाकले. फेव्हिक्विक डोळ्यांत गेल्याने त्यांचे डोळे चिकटले आणि सकाळी ते उघडण्यात त्यांना अडचण येऊ लागली.

Odisha Shocking Incident
Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांची ही अवस्था पाहून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. सुरुवातीला त्यांना गोछापाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी फूलबनी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोळ्यांमध्ये फेव्हिक्विक गेल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना इजा झाली. पण सुदैवाने, त्यांना वेळेवर रुग्णालयात आणल्यामुळे आणि तातडीने उपचार मिळाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून वाचली. सध्या या आठपैकी सात विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरु असून एका विद्यार्थ्याला उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रशासकीय कारवाई आणि निष्काळजीपणाचा प्रश्न

दरम्यान, ही घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि तिचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यामिनी सारंगी यांना यात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेला शाळा आणि हॉस्टेल प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना (Student) पुरेशी सुरक्षा दिली जात नाही आणि त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवली जात नाही, हे या घटनेतून स्पष्ट झाले. या निष्काळजीपणास शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरुन तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

Odisha Shocking Incident
Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांच्या हाती फेव्हिक्विकसारखा धोकादायक पदार्थ कसा लागला? रात्रभर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कोणी नव्हते का? हे कृत्य कोणी केले आणि त्यामागे त्यांचा उद्देश काय होता, या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच मिळू शकतील.

Odisha Shocking Incident
Uttar Pradesh Crime: लऊनऊमध्ये तरुणाचे घृणास्पद कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई; जाणून घ्या काय घडलं?

सध्या संबंधित अधिकारी या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. ही घटना काही विद्यार्थ्यांच्या थट्टेमुळे घडली की, यामागे काही वाईट हेतू होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक वाद किंवा शत्रुत्वामुळे हे कृत्य झाले असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत हे कृत्य अत्यंत धोकादायक आणि अमानवी आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो.

ज्या मुलांनी हे कृत्य केले त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. या घटनेने केवळ ओडिशाच नाही, तर संपूर्ण देशातील शाळा आणि हॉस्टेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com