'पुलिसांक काय Value ना?", नरकासुर मिरवणुकीत आवाज वाढवला, मंडळाने घातली हुज्जत; पोलिसांनी घेतली कडक ऍक्शन

Goa Police Action on Narkasur: संपूर्ण गोव्यात दिवाळीच्या नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुर दहन आणि मिरवणुकांचा मोठा उत्साह असतो
Goa Police
Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संपूर्ण गोव्यात दिवाळीच्या नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुर दहन आणि मिरवणुकांचा मोठा उत्साह असतो. मात्र, या उत्सवात मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी रात्री १२ नंतर कर्णकर्कश संगीत वाजवण्यावर बंदी घातली आहे. मात्र या बंदीवर काम करत असतानाच पोलिसांना पणजीत काही युवकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

पोलिसांना विरोध

कर्णकर्कश संगीताच्या नियमाची अंमलबजावणी करताना पणजी पोलिसांना मळा परिसरात युवकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. रात्री १२ नंतर आणि निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करत संगीत वाजवल्यामुळे पोलीस पथक ध्वनी उपकरणे जप्त करण्यासाठी गेले असता, युवकांनी त्यांना अडवले आणि कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

Goa Police
Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

पाटो येथेही कारवाई

यापूर्वी पोलिसांनी नरकासुर उत्सवादरम्यान सोमवारी (दि. २०) पहाटे पाटो, पणजी येथे कारवाई करत एका ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याने संगीत कन्सोल जप्त केले. येथेही निर्धारित वेळेनंतर आवाज मर्यादेचे स्पष्ट उल्लंघन होत असल्याचे आढळले. पणजी शहरात उत्सवाच्या रात्री ध्वनी निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आयोजकांवर आणि ठिकाणी पोलीस पथकांनी कारवाई केली.

यापूर्वी पोलिसांनी नरकासुर दहन मंडळांसोबत बैठक घेऊन रात्री १२ नंतर शांतता राखण्याच्या उद्देशाने निर्बंध जारी केले होते. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी नियम मोडले जात असल्याने पोलिसांना कठोर पाऊले उचलावी लागली. उत्सवाच्या उत्साहात नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन नियमांचे पालन करण्यावर ठाम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com