Nanoda Accident: सातजणांचे बळी, भीषण अपघात; नानोडा रस्ता बनतोय ‘मृत्यूचा सापळा’

Nanoda Dodamarg Accidents: या रस्त्यावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे
Nanoda Dodamarg Accidents: या रस्त्यावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Nanoda Dodamarg Road

डिचोली: नानोडा - दोडामार्ग रस्ता दिवसेंदिवस वाहतुकीस धोकादायक आणि जीवघेणा ठरत आहे. काल शनिवारी रात्री दोघा युवकांचे या रस्त्याने बळी घेतले असून आत्तापर्यंत या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत. गेल्या पावणेदोन वर्षात तर अस्नोडा-नानोडा रस्त्यावर विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत एक महिला आणि पाच युवकांसह सात जणांचे बळी गेले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून अपघातांचे प्रमाण पाहता नानोडा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याचे स्पष्ट होत आहे. या रस्त्यावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या ९ तारखेला नानोडा येथे कारची कदंबच्या प्रवासी बसगाडीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात साळ येथील महादेव राऊत या ज्येष्ठ नागरिकासह त्यांची सून सोनाली राऊत या ठार झाल्या होत्या. या अपघातात गंभीर जखमी झालेला कारचालक आशिष परब हा युवक सहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला होता.

गेल्या एप्रिल महिन्यात नानोडा येथे कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लाखेरे - डिचोली येथील दुचाकीस्वार संदेश गवळी या युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले होते, तर ३ एप्रिल रोजी मुळगाव - नानोडे रस्त्यावर झालेल्या स्वयंअपघातात अस्नोडा येथील शुभम बाणावलीकर या दुचाकीस्वार युवकाचा बळी गेला होता. गेल्यावर्षी जून महिन्यात नानोडे येथे झालेल्या अपघातात कुडासे - महाराष्ट्र येथील सतीश नाईक आणि शीतल नाईक हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते.

Nanoda Dodamarg Accidents: या रस्त्यावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे
मासळी मार्केटकडे जाताना दोन युवतींवर काळाची झडप; नानोडा येथे कारच्या धडकेत दोघे ठार

शोकाकूल वातावरण

शनिवारी रात्री नानोडा येथील एका वळणावर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात बळी गेलेल्या नानोडा येथील दोन्ही युवकांवर आज (रविवारी) अत्यंत शोकाकुल वातावरणात स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या भीषण अपघातात प्रतीक कानोळकर (वय २२) आणि लक्ष्मण मळीक (वय १९) हे युवक जागीच ठार झाले होते. अपघातात ठार झालेले दोघेही युवक एकमेकांचे मित्र होते. वैद्यकीय अहवालानंतर आज दोन्ही युवकांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. चतुर्थीच्या धामधुमीत दोन युवकांवर क्रूर काळाने झडप घातल्याने पूर्ण नानोडा गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. प्रतिक कानोळकर हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातग्रस्त कारचालक ओमप्रकाश खांबल याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारमधील चौघेही अपघातानंतर पसार झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com