Nana Patekar Death: रात्री नाना पाटेकर एकटेच होते घरी! गोव्यातील जीवलग मित्रांना घटनाक्रम सांगताना अश्रू अनावर

Nana Patekar Death News: नानांच्‍या मृत्‍यूनंतर ‘गोमन्‍तक’ने सलील सावकार यांच्‍याशी संवाद साधला असता त्‍यांनी ‘त्‍या’ तीन तासांमधील घटनाक्रम सांगितला.
Nana Patekar Death News
Nana Patekar DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: हिंदी, मराठी चित्रपटसृष्‍टीतील ‘नटसम्राट’ म्‍हणून ओळखल्‍या जाणारे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे दोनापावला येथील ‘ओशियन पार्क’मध्‍ये असलेल्‍या निवासस्‍थानी हृदयविकाराने निधन झाले. बुधवारी रात्री नाना घरी एकटेच होते. त्रास झाल्‍यानंतर त्‍यांनी करंझाळे येथे राहणारा मित्र अमेय नाईक याला पहाटे २.३० वाजता पहिल्‍यांदा मोबाईलवरून मेसेज आणि त्‍यानंतर ४ च्‍या सुमारास फोन केल्‍याची माहिती समोर आली आहे.

इतर राज्‍यांप्रमाणेच नानांचे गोव्‍यातही शेकडो मित्र होते. सलील सावकार, अमेय नाईक हे त्‍यातीलच. नानांच्‍या मृत्‍यूनंतर ‘गोमन्‍तक’ने सलील सावकार यांच्‍याशी संवाद साधला असता त्‍यांनी ‘त्‍या’ तीन तासांमधील घटनाक्रम सांगितला. ‘‘नाना आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. गोव्‍यात आल्‍यानंतर त्‍यांची आणि माझी निश्‍चितपणे भेट व्हायची. परंतु, यावेळी सम्राट क्‍लबच्‍या शपथग्रहण सोहळ्यानिमित्त गोव्‍यात आलेल्‍या नानांशी काही कारणांमुळे माझी भेट होऊ शकली नाही.

Nana Patekar Death News
FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

गुरुवारी पहाटे २.३० च्‍या सुमारास नानांना शारीरिक त्रास जाणवू लागला. त्‍याची माहिती त्‍यांनी मित्र अमेय नाईक यांना मोबाईलवर मेसेजद्वारे दिली. परंतु, नाईक यांनी तो मेसेज पाहिला नाही. त्‍यानंतर नानांनी पहाटे ४ वाजता अमेय यांना फोन केल्‍यानंतर ते तत्‍काळ करंझाळेहून नानांच्‍या दोनापावला येथील निवासस्‍थानी पोहोचले. त्‍यावेळी नाना घरी एकटेच होते. नानांनी केअरटेकरला ओशियन पार्कच्‍या खाली निवासाची व्‍यवस्‍था करून दिली आहे. परंतु, तो त्याच्या पत्‍नीला उपचारांसाठी बेळगावला घेऊन गेला असल्‍याने तो त्‍यांच्‍यासोबत नव्‍हता’’, असे सावकार म्‍हणाले.

‘‘नानांनी फोन केल्‍यानंतर अमेय आपल्‍या काही मित्रांसोबत तत्‍काळ नानांच्‍या घरी पोहोचले. त्‍यावेळी नाना इस्‍पितळात जाण्‍यासाठी तयार झाले होते. पण, त्‍यांची प्रकृती नाजूक होती. त्‍यामुळे अमेय यांनी तत्‍काळ जवळच असलेल्‍या मणिपाल इस्‍पितळातून रुग्‍णवाहिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पथकाला नानांच्‍या घरी पाचारण केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पथकाने नानांवर तत्‍काळ उपचार सुरू केले. घरातून इस्‍पितळापर्यंत नेईपर्यंत त्‍यांनी उपचार सुरूच ठेवले होते. परंतु, नानांकडून उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही’’, असे सांगताना सावकार भावूक झाले.

हार्ट ॲटॅक, की कार्डियाक अरेस्ट?

डॉ. पनाक कुमार यांनी नानांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. यावेळी डॉ. पीटर रॉड्रिग्ज आणि डॉ. केदारेश्वर नार्वेकर उपस्थित होते. या सर्व गोष्टींचे चित्रीकरण केले आहे. उत्तरीय तपासणीनंतर नानांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट ॲटॅक) की हृदय क्रिया बंद पडून (कार्डियाक अरेस्ट) झाला, याविषयी ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Nana Patekar Death News
Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

सावकार यांना अश्रू अनावर

‘‘आयुष्‍यात येणाऱ्या प्रत्‍येक माणसाला आपलेसे करण्‍याची क्षमता असलेल्‍या नानांशी माझे जिव्‍हाळ्याचे संबंध होते. गोव्‍यातील प्रत्‍येक भेटीत त्‍यांची आणि माझी भेट होत होती; परंतु यावेळी मात्र ती होऊ शकली नाही’’, हे सांगताना सावकार यांचा ऊर भरून आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com