National- Highway : पोरस्कडे न्हयबाग जंक्शन धोकादायक ; दिशादर्शक फलक, विजेची सोय करावी स्थानिकांची मागणी

National- Highway : पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना या जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याची गरज होती.
National- Highway
National- Highway Dainik Gomantak
Published on
Updated on

National- Highway : मोरजी, राष्ट्रीय महामार्ग ६६ पोरस्कडे न्हयबाग जंक्शन धोकादायक स्थितीत असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊन जीवितहानी होत असल्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल, दिशादर्शक फलक आणि विजेची सोय करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी इजिदोर फर्नांडिस, सूर्यकांत चोडणकर व वाहन चालकांकडून केली जात आहे.

पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करताना या जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याची गरज होती. हा रस्ताही धोकादायक बनवला गेला. एका बाजूने रस्ता बंद आहे, तर दुसऱ्या बाजूला एकाच बाजूने चारही बाजूची वाहने ये जा करत असल्याने या जंक्शनकडे पोहचल्यानंतर वाहन चालकांचा गोंधळ उडतो.

परिणामी चारही बाजूने वाहने येताना कोण कुठल्या बाजूने जायचा याचा विचार करत असतानाच एखाद-दुसरे वाहन येऊन अपघात घडवून जाते. हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली जात आहे.

सूर्यकांत चोडणकर यांनी सांगितले की, या जंक्शनवर आल्यानंतर वाहन चालकांना कुठल्या बाजूने जायचे याबाबत गोंधळ उडतो. परिणामी अपघातही घडतात. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याच सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.दिशादर्शक फलक लावले गेले नाहीत.

National- Highway
Pernem News: आमदार आर्लेकर अकार्यक्षम : ॲड. गावकर

जंक्शन बनले मृत्यूचा सापळा !

स्थानिक रहिवाशी इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले, हे जंक्शन म्हणजे मृत्यूचा सापळा बनत आहे.या ठिकाणी किंवा वरच्या बाजूला पोरस्कडे-पेडणेकडे जाण्यासाठी उड्डाणपूल उभारून होणारे अपघात टाळावेत.

आठ दिवसांपूर्वी याच जंक्शनवर एक अपघात झाला होता, त्यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. दोन दिवसानंतर तोही मृत्युमुखी पडला. याचे सरकारला सोयर सुतक नाही. निदान आता तरी सरकारने गंभीर दखल घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com