पणजी महापालिका बैठकीत गदारोळ

नॅशनल थिएटर प्रश्‍न गाजला: कचरा समस्या, विविध विषयांवर चर्चा
Panaji Municipal Corporation
Panaji Municipal CorporationDainik Gomantak

पणजी: नॅशल थिएटरच्या प्रश्‍नावरून पणजी महापालिका बैठकीत आज (सोमवारी) गदारोळ झाला. या जागेचे लीज 2005 सालीच संपुष्टात आले असून यासंबंधी निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या मागणीला महापौर रोहित मोन्सेरात यांनी मान्यता दिली. यावेळी उपमहापौर वसंत आगशीकर, नगरसेवक प्रमेय माईणकर, आयुक्त आग्नेलो फर्नांडिस, इतर नगसेवक तसेच मनपा अधिकारी उपस्थित होते.

कबिर पिंटो यांनी ट्राफीक सिग्नलचा प्रश्‍न लावून धरला. पणजीतील प्रत्येक ट्राफीक सिग्नलच्या वेळेत फरक असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. चालकांना त्‍याचा त्रास सहन करावा लागत असल्याने योग्य ते उपाय करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Panaji Municipal Corporation
आजपासून गोव्यात आठव्या विधानसभेचे अधिवेशन

पणजी नगरपालिका क्षेत्रात पार्किंगसाठीचे बोर्ड आहेत. मात्र, पार्किंग केल्यानंतर किती तासांना किती पैसे आकारावेत याचे फलक लावले नसल्याने कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अस्मिता केरकर व इतर नगरसेवकांनी केली.

सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले की, महानगपालिका जेथे पैसा खर्च करायला हवा तेथे करत नाही. त्यामुळे महापालिकेने चांगल्या पुढाकार घेतल्यास चांगल्या कामांना मदत करण्यास आम्ही सदोदीत तत्पर असल्याचेही ते म्हणाले.

पणजीतील नागरिक पणजी फेरीबोट येथे दरवर्षी गणेश विसर्जन करतात. मात्र, आता तेथे जागाच उरलेला नाही. गणेश विसर्जनावेळी गणपती ठेवून आरती करावी म्‍हटले तरी जागा नाही. सांतिनेज, टोकावरील नागरिक फेरीकडेच विसर्जन करतात. त्यांना तेथे विसर्जनावेळी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फेरीबोटीशेजारील शौचालयात जायला देखील जागा नसल्याने महापौरांनी याविषयी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना माजी महापौर उदय मडकईकर यांनी केली.

Panaji Municipal Corporation
Goa Government: मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी अजित रॉय यांची निवड

भिकाऱ्यांमुळे कचरा

माजी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो व उदय मडकईकर यांनी कचरा प्रश्‍नावर सांगितले की, कचरा समस्या ही भिकारी लोकांमुळे वाढली आहे. भिकारी लोक घाण करीत असल्याने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भिकाऱ्यांची संख्या वाढल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com