Traffic Police: मुरगावचे वाहतूक पोलिस 'ॲक्शन मोड'वर, सहा महिन्यांत 9899 गुन्ह्यांची नोंद; 41 लाखांचा दंड वसूल

Murgao Traffic Police: वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी येथील वाहतूक पोलिसांनी मुरगाव तालुक्यात १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९८९९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.
Murgao Traffic Police
Murgao Traffic PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी येथील वाहतूक पोलिसांनी मुरगाव तालुक्यात १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९८९९ गुन्ह्यांची नोंद करून एकूण ४० लाख ९४ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले.

निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहने हाकणे, एकेरी व बंद रस्ता, विना वाहन परवाना, आयुर्विमा नाही, गणवेश न घालणे, प्रक्षण दाखला नसणे आदी प्रकरणी गुन्हे दाखल केले. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या २४१ जणांना दंड ठोठावला. काही कारवाया न्यायालयीन असल्याकारणाने दंडाची रक्कम वर दिलेल्या माहितीनुसार अधिक आहे, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

अतिवेगाने वाहन हाकल्याने १७५८ जणांवर कारवाई करून ९ लाख ८००० रुपये दंडापोटी वसूल केले. धोकादायक पार्किंग करणाऱ्या १९९४ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून ७ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला. विना हेल्मेटधारक २०६५ दुचाकी चालकांना दंड ठोठावून ८ लाख ४८ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले.

मोबाईलवर बोलताना वाहने चावल्याने २५६ जणांविरुद्ध कारवाई करून १ लाख ५१००० हजार रुपये दंडापोटी रक्कम वसूल करण्यात आले. वाहनांना ओव्हरटेक करणाऱ्या ३० जणांकडून १५००० रुपये दंड वसूल केला. नियमानुसार दिवे न लावलेल्या ३४८ जणांकडून १ लाख ३७ हजार रुपये दंड वसूल केला. विनापरवाना वाहने चालवणाऱ्या ६३ जणांकडून १ लाख ४९ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले.

निर्देशित असलेल्या जागेत पार्किंग केलेल्या १४९ जणांकडून ५२ हजार रुपये दंड वसूल केला. लर्निंग प्लेट न लावल्याने १९ जणांविरुद्ध कारवाई करून ९००० हजार रुपये दंड वसूल केला. नंबरप्लेट नसलेल्या १७२ जणांकडून ८७५०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. योग्य नंबरप्लेट नसलेल्या ८१ जणांकडून २९५०० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Murgao Traffic Police
Goa Assembly Session: "कर्ज काढून सण साजरे करू नका", अर्थसंकल्पावर भाष्य करताना युरी आलेमाव यांचा सरकारला टोला

पुढील बाजूस आरशाशिवाय गाडी चालवणाऱ्या १३१ जणांकडून ५० हजार ५०० रुपये दंड वसूल केला. झेब्रा क्रॉसिंगवर पार्किंग करणाऱ्या २७ जणांकडून १२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. लाल दिवा न पेटणाऱ्या २६८ वाहन चालकांना ९६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच इतर कारवाईतून ४२ जणांकडून २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विविध ५४ प्रकरणात वाहन चालकांकडून मुरगाव तालुक्यात वास्को वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दंडापोटी ७४ लाख ९ हजार ५०० रुपये जानेवारी ते जून २०२५ - या सहा महिन्यांत गोळा करण्यात आले.

केबिनमधून प्रवासी वाहतूक प्रकरणी १५९ जणांकडून ६३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रखर दिवे लावून वाहने हाकल्याने ७२ जणांकडून ३२००० रुपये दंड वसूल केला. केबिनमधून प्रवासी वाहतूक केल्याने १५९ जणांकडून ६३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या ११५ जणांना ६५००० रुपये दंड ठोठावण्यात आला. मालवाहू गाडीतून प्रवासी प्रकरणी ८८ जणांकडून ३७ हजार रुपये दंड वसूल केला. सिटबेल्टशिवाय वाहने चालविणाऱ्या २४८ जणांकडून १ लाख ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

काळ्या काचा असलेल्या ४ जणांकडून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नो पार्किंगच्या जागी वाहने ठेवणाऱ्या ४०० जणांकडून १ लाख २ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. ‘नो एन्ट्री’तून वाहने चालविणाऱ्या ६६९ जणांकडून २ लाख ५२ हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला. बाजू दर्शविणारी लाइट नसणाऱ्या १४ वाहन चालकांकडून ५००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

जागृती कार्यक्रम

वाहतूक नियमांची माहिती व्हावी व नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी वास्को वाहतूक पोलिस विभागातर्फे विविध शिबिरे व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. २०२५ या वर्षात जानेवारी ते जूनपर्यंत वाहन चालकांविरुद्ध वास्को वाहतूक पोलिसांनी निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई केली.

Murgao Traffic Police
Goa Assembly Session: अर्थसंकल्‍प चिप्‍स पाकिटासारखा नव्‍हे, चतुर्थीच्‍या माटोळीसारखा! गोविंद गावडेंसह विरोधकांना CM सावंतांचा टोला

अल्पवयीन चालकांना दंड

अल्पवयीन ३ चालकांकडून दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या २६ जणांकडून १ लाख २५ हजार रुपये दंड वसूल केला. बस थांब्याशिवाय थांबून प्रवाशांना घेणाऱ्या ४ बस चालकांकडून १५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

परवाना नसताना वाहन हाकणाऱ्या १६ जणांना दंड देण्यात आला. वाहतूक परवाना बरोबर न घेतलेल्या ३०३ जणांना २३००० रुपये दंड देण्यात आला. दरवाजा उघडा ठेवून बस व इतर वाहने चालविल्याने ३७ जणांकडून १६५०० हजार रुपये दंड वसूल केला. प्रदूषण परवाना नसल्याने ८० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com