मुरगांव पोर्ट ट्रस्ट (Murgao Port Trust) आस्थापनात काम करणाऱ्या कामगारांचा पगार आणि निवृत्त कामगारांच्या पेन्शनाचा विचार केला तर मुरगांव बंदरातील (Murgao Port) व्यवहार चालू ठेवणे गरजेचें आहे असे मत स्थानिक आमदार (Murgao MLA) तथा नगरविकास मंत्री (Urban Development Minister) मिलींद नाईक (MLA Milind Naik) यांनी व्यक्त केले. दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरीष्ठ नेत्यांची भेंट घेऊन गोव्यात (Goa) आल्यानंतर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक हे दिल्ली भेटीविषयी (Delhi Visit) विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. मंत्री नाईक म्हणाले, की एम.पी.टी. आस्थापनांमध्ये पूर्वी ९००० हजारांहून अधिक कामगार होते. आज ती संख्या सुमारे १६०० कामगारांवर (1600 Workers) आली आहे.तर ५००० अधिक पेन्शन धारक (Pensioners) आहेत. सद्या मुरगाव बंदरात जेएसडब्लयू (JSW),अदानी (Adani) या कंपनीचा कोळसा व्यवहार प्रदूषण नियंत्रण ठेवून चालू आहे(Pollution Control). त्यामुळे आपल्याला प्रदूषण विरहित व्यवसाय हवे(Pollution Free Business). मात्र सद्या चालू असलेला व्यवसाय बंद केला तर या कामगारांचा पगार तसेच निवृत्त झालेल्या कामगारांना वेळेवर पेन्शन कुठून देणार हा मोठा प्रश्न आहे. गोव्याचा खाण व्यवसाय बंद झाल्यापासून (Closure of Goa's Mine Business) मुरगांव बंदरातील सगळे व्यवसाय बंद आहेत(Closed Murgao Port Businesses).
मुरगांव बंदर हे फक्त मुरगावातील जनतेसाठी नसून संपूर्ण गोव्याचा संबंध या बंदराकडे येतो. या बंदरामुळे उद्योग क्षेत्रातील इतर व्यावसायिकांना व्यवहार मिळत असून कुठल्याही परिस्थितीत बंदराचे व्यवहार चालू ठेवणे गरजेचें आहे, असे मंत्री नाईक यांनी म्हटले. गांधीनगर ते मुरगांव पर्यंतचे चारपदरी मार्गाचें ९० टक्के काम पुर्ण झाले आहे. गॅमन इंडिया कंपनीने (Gammon India Company) आता पर्यंत स्वतः खर्च केलेले २० कोटी रुपये केंद्र सरकारने (Central Govt.) द्यावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेंट घेवून त्यांच्या समोर ह विषय मांडला(To meet Central minister Nitin Gadkari). त्यांनी लवकरात लवकर ह विषय तडीस लावण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांला दिला असल्याची माहिती नगर विकास मंत्री मिलींद नाईक यांनी दिली. (Mugao Port)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.