Murder At Chimbel: गोव्यातील चिंबल येथे कौटुंबिक वादातून खून; काय घडले जाणून घ्या सविस्तर...

पोलिसांनी नाकाबंदी करून चौघा संशयितांना केले जेरबंद
Murder At Chimbel
Murder At ChimbelDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Murder News: चिंबल येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मुरगन ऊर्फ बाल्लू गवंडर याचा चाकूने भोसकून खून करण्‍यात झाले. या प्रकरणी जुने गोवे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

(Murder At Chimbel)

प्रतीक्षा ऊर्फ नीलिमा परशुराम गवंडर, परशुराम गवंडर, लिंगनाथ रघुनाथ पालयेकर ऊर्फ पालकर व हेमंत रघुनाथ पालकर अशी संशयितांची नावे आहेत. कर्नाटकात पसार होण्याच्या प्रयत्नात असताना त्‍यांना ठिकठिकाणी नाकाबंदी करून जेरबंद करण्‍यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर-चिंबल येथे राहत असलेला टॅक्सीचालक दीपक माने यांच्या घरासमोर येऊन संशयितांनी त्‍यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्‍यास सुरूवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

Murder At Chimbel
Goa Staff Selection Commission: सप्टेंबरमध्ये नोकरभरतीची पहिली जाहिरात; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

त्‍यामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. संशयितांनी तक्रारदाराच्या पत्नीला मारहाण करण्याबरोबरच तक्रारदाराचा नातेवाईक सुब्रमण्‍यम गवंडर याच्या अल्पवयीन मुलालाही मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक केली.

त्यानंतर या सर्व संशयितांनी तक्रारदाराचा मेहुणा मुरगन ऊर्फ बाल्लू गवंडर याच्यावर हल्ला चढवला. त्यातील लिंगनाथ पालयेकर याने मुरगनच्या छातीवर चाकूने वार केले. त्‍यात मुरगनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयितांनी तेथून पलायन केले.

मृतदेह पडला होता रक्ताच्‍या थारोळ्‍यात
घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलिसांनी रात्रीच त्या ठिकाणी धाव घेतली. मुरगन याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

संशयितांना अटक करण्यासाठी घटनेची माहिती बिनतारी संदेशाद्वारे सर्व पोलिसस्थानकांना पाठविली. त्यामुळे गोव्यातून बाहेर जाणे शक्य असलेल्या सर्व चेकनाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली. संशयितांची माहिती व छायाचित्रेही पोलिसांना पाठवण्यात आली होती.

Murder At Chimbel
Water Shortage in Bardez: बार्देश तालुक्यातील 'या' भागांमध्ये 3 जुनला मर्यादित पाणीपुरवठा

एका संशयिताला चोर्लाघाट परिसरात अटक
संशयितांच्या शोधमोहिमेसाठी चार वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी लिंगनाथ पालयेकर व प्रतीक्षा ऊर्फ नीलिमा गवंडर यांना रात्रीच ताब्यात घेतले तर तिसरा संशयित हेमंत पालकर हा अटक चुकवून गोव्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होता.

साखळीतून चोर्लाघाटाकडे जाणाऱ्या परिसरातून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिस पथकाने त्याचा मागोवा काढत त्याला ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com