

पणजी: गोव्याचे राज्यपाल आणि तत्कालीन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू तसेच एअर इंडियाचे माजी अध्यक्ष अश्वनी लोहानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करणारी याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.
२०१७ मधील विमान सुरक्षा नियमांच्या कथित उल्लंघनप्रकरणी या दोघांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दिंडोशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
विमान वाहतूक अधिकारी के. व्ही. जगन्नाथराव यांनी ही याचिका दाखल केली होती. १९ जानेवारी २०१७ रोजी कॅप्टन अरविंद कथपालिया यांनी दिल्ली-बंगळुरू मार्गावरील एअर इंडियाचे एआय-१७४ हे विमान उड्डाणापूर्वी अनिवार्य श्वास विश्लेषक चाचणी न करताच चालविल्याचा आरोप होता.
त्यानंतर रात्रीच्या परतीच्या एआय-१७३ विमानाचेही त्यांनी उड्डाण केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. राज्यपाल अशोक गजपती राजूंना दिलासा; २०१७ च्या विमान सुरक्षा प्रकरणात एफआयआरची मागणी फेटाळली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.