Mumbai Goa Vande Bharat Train : 'वंदे भारत’ मडगाव-मुंबई मार्गावर 5 जूनपासुन नियमित

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती
Mumbai Goa Vande Bharat Train Update
Mumbai Goa Vande Bharat Train Update Dainik Gomantak
Published on
Updated on

ओडिशात बालासोर येथे शुक्रवारी रात्री कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात (Coromandel express accident) होऊन शेकडो लोक मत्युमुखी पडले व कित्येक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडीली. यामुळे आज शनिवारी मडगाव रेल्वे स्थानकावर होणारा ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला.

दरम्यान ही एक्सप्रेस आता 5 जूनपासून मुंबई-मडगाव व परत या मार्गावर नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली. 5 जून रोजी सीएसटी मुंबई स्थानकावरून सकाळी 5.25 वाजता ही गाडी सुटेल.

Mumbai Goa Vande Bharat Train Update
Goa Tourism : पर्यटनमंत्र्यांनी 'दिल्लीवाल्यां'ची नावे जाहीर करावी; गोवा काँग्रेसची मागणी

या दुर्घटनेची बातमी धडकल्याबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री आश्र्विन वैष्णव जे या शुभारंभ कार्यक्रमासाठी मडगावात आले होते, ते लगेच ओडिशाला जायले निघाले. गेल्या आठ दिवसांपासून ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे आठ डबे मडगाव स्थानकावर आणून ठेवले होते.

मात्र, दुर्घटनेची बातमी कळल्यानंतर व शुभारंभाचा कार्यक्रम रद्द केल्याने ही गाडी शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाली, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

मडगाव स्थानकावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. गोव्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार व कोकण रेल्वेचे अधिकारी या कार्यक्रमाला हजर राहणार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com