Raj Thackeray And Pramod Sawant: मागील बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथे निर्धार मेळाव्याला संबोधित केले. राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारावर सडकून टीका केली. महामार्गाच्या कामात होणाऱ्या विलंबाबाबत खेद व्यक्त केला.
कोकणात सुरू असलेल्या अनियंत्रित जमीन खरेदीबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली तर गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावर आजवर 15,566 कोटी रूपये खर्च करण्यात आले तसेच, या मार्गावर आजवर अपघातात 2,500 नागरिकांचा मृत्यू झाले. मात्र, अद्याप हा महामार्ग पूर्ण झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी वारंवार चर्चा केली. पण, प्रत्येकवेळी त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. येत्या 2024 पर्यंत महामार्ग पूर्ण होणार असे सांगितले जात आहे. चांगली बाब आहे पण, आत्ताचे काय? येणाऱ्या गणेशोत्सवाचे काय? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता नाट्यावर देखील राज ठाकरे यांनी सडकून टीका केली.
गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे केले कौतुक
राज ठाकरे यांनी कोकणात कोणीही जमीन खरेदी करत असून, त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. पण, गोव्यात शेतजमीन खरेदीसाठी कायदा करण्यात आल्याचा दाखला देत राज ठाकरेंनी गोवा आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक केले.
"गोव्यात शेत जमीन केवळ शेती कामासाठीच खरेदी करता येईल असा कायदा करण्यात आला आहे. आणि शेत जमीन खरेदी केल्यास तिथे शेतीच करावी लागेल दुसरा व्यवसाय करता येणार नाही. असा कायदा केला आहे." असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या भाषणाचा दाखला देखील दिला. "आम्ही गोव्याचा गुरगाव, छत्तीसपूर होऊ देणार नाही. याचा अर्ध आम्ही उत्तरेतील लोकांना येथे जमिनी देणार नाही." असे राज ठाकरे भाषणात म्हणाले.
"गोव्यात राज्य भाजप सरकार चालवत आहे तेथील मुख्यमंत्री भाषणात उत्तरेतून येणाऱ्या लोकांना येथे जमिनी देणार नाही असे सांगतात. तसा मी बोललो तर राज ठाकरे देशविरोधी." असेही खोचक भाष्य यावेळी
मुंबई - गोवा महामार्गासाठी आंदोलनाची हाक
मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसेने आंदोलनाची हाक दिली. चांगला रस्ता मिळावा यासाठी हे आंदोलन असेल, पनवेल ते सावंतवाडी दरम्यान आंदोलन करण्यास राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.