मुंबई गोवा हायवेवर 'डिझेल' मिळेल का? सोशल मीडियावर पडला कमेंटचा पाऊस; पोस्ट टाकणाऱ्याने अनुभव लिहिला की, ' 80% पंपांवर.....'

Mumbai Goa Highway Petrol Diesel Update: सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इज्राईल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनदर आणि पुरवठा याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai Goa Highway Petrol Diesel Update
Mumbai Goa Highway Petrol Diesel UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इज्राईल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनदर आणि पुरवठा याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही गॅस सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत विविध अफवा पसरताना दिसत आहेत. विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या संदर्भात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये पेट्रोल-डिझेल पुरवठ्याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, या आवाहनानंतरही अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. परिणामी, पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. काही ठिकाणी वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने टाक्या फुल करून घेण्याचा कल दर्शवला आहे.

Facebook
FacebookDainik Gomantak

दरम्यान, सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा रंगताना दिसत आहे. फेसबुकवरील एका ग्रुपमध्ये एका युजरने मुंबई-गोवा महामार्गावर डिझेल उपलब्धतेबाबत प्रश्न विचारला होता. या पोस्टवर अनेकांनी तत्काळ प्रतिक्रिया देत आपले अनुभव शेअर केले. एका युजरने “पेट्रोल आणि डिझेल दोन्ही उपलब्ध आहे, मी आजच भरले,” असा प्रतिसाद दिला. तर काहींनी प्रवासादरम्यान जिथे इंधन मिळेल तिथे टाकी फुल करून घेण्याचा सल्ला दिला.

Mumbai Goa Highway Petrol Diesel Update
अफवांचे पीक, पेट्रोलपंपांवर रिघ! "राज्‍यात इंधनाचा पुरेसा साठा, लोकांनी घाबरू नये" मुख्‍यमंत्र्यांची माहिती

काही युजर्सनी मात्र पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीबाबतही माहिती दिली. या सर्व प्रतिक्रियांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले. तथापि, मूळ पोस्ट करणाऱ्या युजरने नंतर स्वतःचा अनुभव शेअर करत इंधन सहज उपलब्ध झाल्याचे आणि कुठेही मोठ्या रांगा लागल्या नसल्याचे स्पष्ट केले.

Mumbai Goa Highway Petrol Diesel Update
LPG Gas Cylinder: सिलिंडरटंचाईचा मोठा फटका! कदंब स्थानकावरील कॅन्टीन बंद, वादावादीचे प्रकार वाढले; काही ठिकाणी चुलीला प्राधान्य

एकूणच, सध्याच्या परिस्थितीत अफवांपासून दूर राहून अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे प्रशासन पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com