मुंबई: मुंबई - गोवा महामार्गावरून महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून राजकारण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली.
महामार्गावरील अपघातास जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर आता दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलिस ठाण्यात चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि ॲपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी हुकमीचंद जैन, अवधेशकुमार सिंह, सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल केला आहे. तर, अभियंता सुजित कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपापूर्वी मुंबई - गोवा महामार्गाच्या दुराव्यस्थेवरुन रामदास कदमांनी भाष्य करत मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महामार्गावरुन सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याने खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी रस्त्यावर उतर महामार्गाची पाहणी केली.
मुंबई - गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या २६.७ किमी अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या टप्प्यात झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला असून, अनेकांना किरकोळ ते गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे.
एका आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर लहान मोठे १७० अपघात झाले असून, त्यात ९७ जणांचा बळी गेला आहे. तसेच, २०८ प्रवाशांना किरकोळ ते गंभीर दुखापत झालीय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.