Goa Pollution: प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर जाग !

Goa Pollution: मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ओपा जल प्रकल्प तसेच नदीचे पाणी तपासणीसाठी नेण्यात आले.
Muddy Water
Muddy WaterDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ponda: ओपा (Opa) जल प्रकल्पाशी संबंधित दूधसागर आणि खांडेपार नदीत गढूळ पाण्याचा प्रादुर्भाव होत असल्याने या प्रकाराची चौकशी करण्यासाठी अखेर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (State Pollution Control Board) काल नदीचे पाणी तपासणीसाठी नेले आहे. याप्रकरणी आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रार दाखल केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) खडबडून जागे झाले आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ओपा जल प्रकल्प तसेच नदीचे पाणी तपासणीसाठी नेले. आता यातून काय निष्पन्न होईल कुणास ठाऊक, पण खनिज गाळ मिश्रित पाणी अधूनमधून नदीत सोडले जात असल्यामुळेच नळांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे.

Muddy Water
Goa Government : गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून ‘गृहआधार’चा गैरफायदा; 27 लाख वसूल

पंधरवड्याच्या आत दोनवेळा खांडेपार व दूधसागर नदीत गढूळ खनिज गाळ मिश्रित लाल पाणी सोडल्यामुळे खळबळ उडाली होती. हे गढूळ लाल पाणी ऐन चतुर्थीत काही नळांना आल्याने लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. हे गढूळ पाणी कोडली भागातील एका खाण प्रकल्पातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आधी अशा प्रकल्पाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

दूधसागर व खांडेपार नदीला अधूनमधून गढूळ पाणी येत असले, तरी राज्याचे जलस्त्रोत खाते गप्पच आहे. हे गढूळ पाणी कुठून आणि कसे येते, त्याचा छडा लावणे आधी गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा नदीचे पात्र लाल झाले आहे, म्हणूनच नळांनाही गढूळ पाण्याचा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी याप्रकरणी गंभीरपणे लक्ष घालण्याची आवश्‍यकता व्यक्त करण्यात येत आहे.

Muddy Water
Goa Ganeshotsav: पोलीसांची 'बाप्‍पाला' सलामी

दूधसागर व खांडेपार नदीत गढूळ लाल पाणी सोडले जात असल्याने त्याचा फटका ओपा जल प्रकल्पाला बसतो. या प्रकल्पाचे फिल्टर गढूळ पाण्यामुळे ‘जाम'' होत असून त्याचा थेट यंत्रणेवर परिणाम होतो. त्यामुळेच ऐन चतुर्थीत काही भागातील नळांना गढूळ पाणी आले. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून सरकारी यंत्रणेने ही बाब गंभीरपणे घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com