श्री. वासुदेव व्ही. धेंपो स्मृती फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा; केरळचा मार्थांदन विजेता

टायब्रेकर गुणांत अव्वल; सांतू मोंडल उपविजेता, ग्रँडमास्टर सप्तर्षी तिसऱ्या स्थानी
श्री. वासुदेव व्ही. धेंपो स्मृती फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा; केरळचा मार्थांदन विजेता
Published on
Updated on

केरळच्या के. यू. मार्थांदन याने ‘श्री. वासुदेव व्ही. धेंपो स्मृती’ फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्याचे आणि सांतू मोंडल यांचे नऊ फेऱ्यांनंतर समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुणांत मार्थांदन अव्वल ठरला, तर सांतू याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम स्मृती सभागृहात झाली. ग्रँडमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी (रेल्वे) याला सात गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.

प्रत्येक सात गुण झालेल्या अन्य खेळाडूंत ओ. टी. अनिलकुमार (केरळ), सिद्धांत पूंजा (कर्नाटक), जॉय लाझार (केरळ), मंदार लाड (गोवा), जे. रामकृष्ण (युनियन बँक), प्रदीप तिवारी यांना अनुक्रमे चौथा ते नववा क्रमांक मिळाला.

जॉयदीप दत्ता, सौरीश काशेलकर, आयुष शिरोडकर, यू. यू. एहाझ, इयान रॉड्रिग्ज, जोशुआ तेलिस, अस्मिता रे, रुद्र राजीव, साईरुद्र नागवेकर, किर्पेश, आदित्य सावळकर, विक्रमादित्य कुलकर्णी, अजयकुमार राय, अर्विन आल्बुकर्क, साहिल शेट्टी, उडुपी आचार्य, एड्रिक वाझ, ऐडन सावियो ग्राओ, आर्यन रायकर, यश प्रभू, अभिनीत भट यांना अनुक्रमे १० ते २५व्या क्रमांकापर्यंतचे बक्षीस मिळाले.

याशिवाय अविनाश कोचरेकर, कार्जी महिंद्र, अनिकेत बापट (१७९९ एलो खालील), ऋषिकेश परब, नवनीत श्रीकांत, चैतन्य गावकर (१५९९ एलो खालील), एन. ऋषी, आद्या गौडा, आयुष नाईक (१३९९ एलो खालील), आर्यन नाईक, इव्हान तेलिस, सिध राणे (बिगरमानांकित), सुहास अस्नोडकर (व्हेटरन), जेनिस सिक्वेरा (महिला गटात उत्कृष्ट) यांनाही बक्षीस मिळाले.

राजेश धेंपे, ग्रँडमास्टर अनुराग म्हामल, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव दत्ताराम पिंगे, सत्यवान हरमलकर, आतीश आंगले, पल्लवी काकोडकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com