Movement Against Plastic Waste: कचरा प्रकल्पात झोपून केले उपोषण

सडा येथील नवीन कचरा प्रकल्पातील प्लास्टिक अखेर उचलले
Movement Against Plastic Waste
Movement Against Plastic WasteDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को- सडा येथील नवीन कचरा प्रकल्पामध्ये जमा झालेला प्लास्टिक कचरा उचलण्यात न आल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी कचऱ्यावर झोपत लाक्षणिक उपोषण केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने कचरा ट्रकाद्वारे नेण्याच्या कामाला आरंभ केला. याकामी पुन्हा हयगय झाल्यास आपण पुन्हा उपोषण करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले होते. कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेपासून काही अंतरावर दुसरा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला होता.

त्यासाठी तेथे यंत्रे आणण्यात आली होती. तेथे ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात होते. ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खत, प्लास्टिक कचरा काही फॅक्टरींना पाठविण्यात येत होते. मात्र, कोरोनामुळे सदर कामाला अडचण निर्माण झाली.

Movement Against Plastic Waste
Aquaculture Workshop: आमच्या निर्णयांमुळेच मत्स्य संपदेचे रक्षण- ढवळीकर यांचा दावा

तेथील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. परंतु, प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात तसाच पडून होता. सदर प्रकल्पातील प्लास्टिक कचरा उचलण्यात येत नसल्याबद्दल पोळजी यांनी अभिनव पद्धतीने लाक्षणिक उपोषण केले.

ते त्या कचऱ्यावर एक तास झोपले. त्याच्या या लाक्षणिक उपोषणामुळे तेथील कचरा हलविण्याच्या कामाला दुसऱ्या दिवसांपासून आरंभ झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com