Goa Motorcycle Pilot: पायलटांची आमदनी अठन्नी; खर्चा रुपय्या!

Motorcycle Taxi: गोव्यातील पायलट व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर
Motorcycle Taxi: गोव्यातील पायलट व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर
Goa Motorcycle PilotDainik Gomantak
Published on
Updated on

भरवशाचा, आधाराचा आणि विश्वासाचा मानला जाणारा व्यवसाय म्हणजे राज्यातील पायलट व्यवसाय. राज्याची वेगळी ओळख असलेला हा व्यवसाय. कोणत्याही क्षणी लोकांच्या मदतीला धावणारे हे व्यावसायिक यावरच अनेक कुटुंबांची दिनचर्या अवलंबून होती आणि आजही आहे.

पण आता बदलेली प्रवासाची साधने, महागाई आणि इंधनाचे भडकलेले दर यातूनच व्यवसायात वाढलेल्या स्पर्धेमुळे या व्यवसायावर परिणाम होत आहे.त्यामुळे आमदनी अठन्नी; खर्चा रुपय्या अशी स्थिती झाली आहे.

दिवसाची किमान कमाई मिळणे, या व्यावसायिकांना कठीण होत आहे. त्यामुळे जे पूर्वीपासून मोटारसायकल पायलट व्यवसायावर अवलंबून आहेत, तेच आज व्यवसाय पुढे चालवत आहेत.

परंतु, नवी पिढी या व्यवसायापासून दूर झाली आहे. त्यामुळे व्यवसाय इतिहासजमा होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आज हा व्यावसायिक दुर्लक्षित झाले.

म्हापसा शहरात पायलटची सरकार मान्यताप्राप्त सात स्थानके आहेत. तेथून सरासरी ५० हून जास्त पायलट लोकांना सेवा देतात. त्यातील बहुतांश पायलट ग्राहक मिळत नसल्याने दुपारच्या वेळी स्थानकावर फिरकत नाहीत. याच व्यवसायावर अवलंबून आहेत, तेच आज व्यवसाय पुढे चालवत आहेत.

कोविड महामारीनंतर व्यवसायावर मोठा परिणाम आला. व्यवसाय चालत नसल्याने वाहन बंद करून घरी बसणे भाग पडले. खासगी वाहनांची संख्या आणि स्पर्धाही वाढली, ऑफर न मिळाल्याने, सुविधा न सुरू झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला. स्पर्धा वाढल्याने ग्राहकांचा कलही बदलला आहे, असे म्हापशातील काही मोटारसायकल पायलटनी सांगितले.

Motorcycle Taxi: गोव्यातील पायलट व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर
Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

व्यवसाय सोडला!

पायलटाचे हित लक्षात घेऊन सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना सध्या बंद आहे. पाच वर्षानंतर जुनी झालेली वाहने दुरुस्त करण्यास अनुदान दिले जायचे तेही बंद आहे. कोविडच्या काळात ५ हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते. पण बहुतांश पायलटना अद्यापही त्याचा लाभ मिळालेला नाही. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी वयानुसार बँकेकडून कर्ज मिळवणेही कठीण झाले आहे. कर्ज मिळत नसल्याने काहींनी व्यवसाय सोडून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com