Khandepar Accident: मुलाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आईला 15.96 लाख भरपाईचा आदेश! आठ वर्षांपूर्वीची दुर्दैवी घटना

Querim Khandepar Accident compensation: मयत हेरंबच्या आई आशालता सुभाष तिळवे यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी मोटार वाहन दावे लवादाकडे भरपाईचा दावा केला होता.
Goa Live Updates
Goa CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Motor accident compensation order Querim Khandepar

पणजी: केरी - खांडेपार येथे आठ वर्षापूर्वी ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात हेरंब सुभाष तिळवे या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मोटार वाहन दावे लवादाने ट्रक चालक व मालक तसेच विमा कंपनीला १५.९६ लाख रुपये भरपाई हेरंबच्या आईला देण्याचा आदेश दिला.

ही भरपाई दावे अर्ज सादर केल्यापासून ९ टक्के व्याजाने ३० दिवसांत द्यावी. ही भरपाई दिलेल्या मुदतीत न दिल्यास २ टक्के अधिक व्याज दंड द्यावा लागेल, असे निवाड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

मयत हेरंबच्या आई आशालता सुभाष तिळवे यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी मोटार वाहन दावे लवादाकडे भरपाईचा दावा केला होता. त्यामध्ये ट्रक चालक बरुणा कुमार रावता, मे. एम. व्यंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. (मालक) व युनायटेड इंडिया इन्सुरन्स

Goa Live Updates
Colvale Accident: भरधाव कारच्या धडकेत मायलेकी जखमी, कोलवाळ येथील घटना; कारचालकास अटक

कंपनी लि. या तिघांना प्रतिवादी करण्यात आले होते. ५ जानेवारी २०१७ रोजी हेरंब हा दुचाकीवरून खांडेपारच्या दिशेने येत होता. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. या धडकेने मागे बसलेला हेरंब दुचाकीवरून उडून रस्त्यावर आपटला होता. त्याचवेळी ट्रकाचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

Goa Live Updates
Vasco Accident: वाहनचालकाचे नियंत्रण जाऊन भरधाव कार घुसली चुकीच्या लेनमध्ये, वास्को येथील अपघातात दोघे ठार

वेगाने ट्रक चालवत नव्हतो; चालकाचा दावा

संशयित ट्रक चालकाने या दावे अर्जात लेखी विधान सादर केले होते. त्यामध्ये त्याने भरधाव वेगाने ट्रक चालवत असल्याचा इन्कार केला होता. ट्रक मालकानेही चालकाने सादर केलेल्या उत्तराला दुजारा देत लेखी उत्तर दिले होते. विमा कंपनीने सादर केलेल्या उत्तरात दुचाकी चालकाकडे परवाना नव्हता तसेच ट्रक चालकाकडे परवाना नव्हता. वाहनाची फिटनेस तसेच विमा पॉलिसीचे नूतनीकरण केले नव्हते. त्याची माहिती विमा कंपनीला दिली नव्हती, अशी बाजू मांडण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com