Vasco Accident: वाहनचालकाचे नियंत्रण जाऊन भरधाव कार घुसली चुकीच्या लेनमध्ये, वास्को येथील अपघातात दोघे ठार

Goa Accident: निस्सार अहमद व दुसरा कारचालक मुनिस्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले.
Goa Latest Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco Car Accident

वास्को: एक भरधाव कार चुकीच्या लेनमध्ये गेल्यानंतर तिने समोरील दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालक सुरेश जग्गल याचा जागीच मृत्यू झाला; तर समोरील कारमधील जखमी प्रवासी निस्सार अहमद (५४, बंगलोर) यांचा उपचारादरम्यान मृत्‍यू झाला. हा विचित्र अपघात आज पहाटे पाचच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे वाडे–वास्को येथे राहणारा सुरेश जग्गल हा निस्सार अहमदसह आपल्या स्विफ्टने सोमवारी (ता.२०) पहाटे पाचच्या सुमारास कुठ्ठाळीहून सांकवाळमार्गे वास्कोकडे येत होता. अतिशय बेदरकारपणे तो कार हाकत होता. कारसह शीला बार अँड रेस्टारंटसमोर पोहचल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार चुकीच्या मार्गाने जाऊन समोरून येणाऱ्या इर्टिंका कारला धडकली.

Goa Latest Accident News
Dharbandoda Accident: वाढदिवसाची पार्टी करुन परतणाऱ्या तरुणाला वाहनानं उडवलं, 2 महिन्यांच्या चिमुरड्याचं छत्र हरपले

या धडकेत सुरेश जग्गल जागीच मरण पावला. निस्सार अहमद व दुसरा कारचालक मुनिस्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान निस्सार याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com