Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Shirgao Panchayat : वेदिका शिरगावकर यांच्यासह सूर्यकांत पाळणी आणि देवराज गावकर या तीन पंचसदस्यांनी हा अविश्वास ठराव आणला होता.
शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत
Shirgao PanchayatDainik Gomantak

मये मतदारसंघातील शिरगाव पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाविरोधात आणलेला अविश्वास अखेर संमत झाला आहे. त्यामुळे या पंचायतीत आता सत्ताबदल अटळ आहे.

पाच पंचसदस्यीय शिरगाव पंचायतीच्या सत्ताधारी गटात फूट पडून विद्यमान सरपंच करिश्मा गावकर आणि उपसरपंच जयंत गावकर यांच्या विरोधात गेल्या मंगळवारी (ता.२५ जून) रोजी अविश्वास ठराव आणण्यात आला होता.

वेदिका शिरगावकर यांच्यासह सूर्यकांत पाळणी आणि देवराज गावकर या तीन पंचसदस्यांनी हा अविश्वास ठराव आणला होता.

अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आज (बुधवारी) पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस मावळते सरपंच, उपसरपंचांसह पाचही पंचसदस्य उपस्थित होते. या बैठकीत अविश्वास ठरावावर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आले.

त्यात ठराव 3 विरुद्ध 2 अशा मतांनी संमत झाला. डिचोली गट विकास कार्यालयातील अधिकारी तथा निर्वाचन अधिकारी प्रतापराव राणे यांच्या देखरेखीखाली ही बैठक झाली. सूर्यकांत पाळणी यांनी ही माहिती दिली.

शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत
NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

सरपंचपदी वेदिका

शिरगाव पंचायतीचे सरपंचपद महिलेसाठी राखीव आहे. अविश्वास ठराव आणलेल्या गटात वेदिका शिरगावकर या एकमेव महिला पंचसदस्य आहेत.

त्यामुळे आता वेदिका शिरगावकर यांचा सरपंचपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर उपसरपंचपदी या गटातील सूर्यकांत पाळणी यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com