Goa News
Goa NewsDainik Gomantak

मानसिक तणावाने केला घात; मातेच्या हातून चिमुरडीचा अंत

चिखलीतील घटना : नदीत उडी घेऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न
Published on

वास्को: मानसिक तणावातून मातेच्‍या हातून 14 महिन्‍यांच्‍या चिमुरडीचा अंत होण्‍याची खळबळजनक घटना चिखली-दाबोळी येथे शनिवारी घडली. मुलीच्‍या हत्‍येनंतर मातेने जुवारी नदीच्‍या पुलावरून उडी घेत आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. मात्र, परिसरात असणाऱ्या कामगारांनी तिला वाचवले. निमिषा गोणे (वय 38) असे तिचे नाव असून, तिच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. निमिषा हिने आपल्या घरात दोन्ही हातांच्या शिराही कापून घेतल्या होत्या. या घटनेने राज्‍य हादरून गेले आहे.

(mother committed the murder of a little girl)

Goa News
गोवा बोर्ड 2022-23 साठी 2 सत्रात होणार परीक्षा

अधिक माहिती अशी की, सात दिवसांपूर्वी निमिषा जर्मनीहून आपल्या १४ महिन्यांच्या मुलीसह गोव्यात आली होती आणि चिखली येथे आपल्या वडिलांकडे राहात होती. निमिषाचा पती नीलेश गोणे हा जर्मनीत काम करतो. पी. वाल्सन यांची निमिषा ही तीन मुलींपैकी दुसरी मुलगी. निमिषा नैराश्यावर डॉक्टरांकडून उपचार घेत होती. शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत ती वडिलांशी बोलत राहिली. नंतर ती तिच्या मुलीसोबत वरच्या मजल्यावर झोपायला गेली. तिने पहाटेच्या सुमारास मुलीची हत्या केली. हत्या कशी केली, हे समजू शकले नसले तरी गळा दाबून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. मुलीची हत्या केल्यानंतर तिने आपल्या दोन्ही हातांची नस कापली. त्यामुळे घरासमोरील व्हरांड्यात रक्त सांडले होते.

आठवडाभर नैराश्‍यात

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा ही अजून जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने तिने हा प्रयत्न का केला, हे समजू शकले नाही. मात्र, तिचे वडील पी. वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला आठवडाभर ती नैराश्यात होती. ३ ऑगस्ट रोजी ती एका मानसोपचार तज्ज्ञालाही भेटून आली होती.

ग्रील्सच्या आधाराने अंगणात उतरली

मुलीची हत्या केल्यानंतर निमिषाने स्वतःच्या हातांची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. घरातल्या लोकांना समजू नये म्हणून ती बेडरूमच्या गॅलरीचा दरवाजा उघडून ग्रील्सचा आधार घेऊन खाली उतरली. जाण्यापूर्वी तिने आपले दोन्ही मोबाईल फोन अंगणातील झाडाखाली टाकले. बूट गेटबाहेर काढून ती आत्महत्या करण्यासाठी चारचाकी वाहन घेऊन झुआरी पुलावर गेली.

Goa News
Goa Petrol-Diesel राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ?

पती नीलेश परतल्यावर उलगडा शक्य

निमिषाचा पती नीलेश हा रविवारी जर्मनीहून गोव्यात परतणार आहे. निमिषा सध्या गोमेकॉत उपचार घेत असून ती अजून शुद्धीवर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल. उद्या तिचा पती आल्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

बुडतानाचा व्हिडीओ व्हायरल : निमिषाने झुआरी नदीत उडी मारल्याचा प्रकार पुलावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी पाहिला व ती बुडत असलेला व्हिडीओ व्हायरल केला. नंतर तेथे जवळच असलेल्या दिलीप बिल्डकॉन लिमिटेडच्या कामगारांनी बुडणाऱ्या निमिषाला पाण्याबाहेर काढले.

दूध आणण्याचे निमित्त

आज सकाळी तिने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांकडे जाऊन दूध आणायचे आहे, असे सांगून त्यांच्या गाडीची चावी घेतली आणि तीच गाडी घेऊन ती झुवारी नदीकाठी गेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com