Mangul Gangwar Case: मुंगूल गँगवाॅर प्रकरणाचा वॅलीच ‘मास्‍टरमाईंड’! फातोर्डा पोलिसांचा दावा; अटकपूर्व जामिनावर शनिवारी सुनावणी

Mostwanted Vally Dicosta Mastermind: अनेक गुन्‍हेगारी प्रकरणांत सामील असलेला ‘मोस्‍टवॉन्‍टेड’ वॅली डिकॉस्‍ता हाच मुंगूल गँगवॉर प्रकरणातील ‘मास्‍टरमाईंड’ असल्‍याचा दावा फातोर्डा पोलिसांनी केला आहे.
Most Wanted Vally Dicosta
Most Wanted Vally DicostaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: अनेक गुन्‍हेगारी प्रकरणांत सामील असलेला ‘मोस्‍टवॉन्‍टेड’ वॅली डिकॉस्‍ता हाच मुंगूल गँगवॉर प्रकरणातील ‘मास्‍टरमाईंड’ असल्‍याचा दावा फातोर्डा पोलिसांनी केला आहे. या टोळी युद्धात आणखी कुणाचा हात आहे का, हे तपासण्‍यासाठी वॅलीला पोलीस काेठडी देऊन त्‍याचा तपास करण्‍याची गरज आहे, अशा आशयाचे निवेदन फातोर्डा पोलिसांनी दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयाला दिले आहे.

वॅली डिकॉस्‍ता याने या प्रकरणात आपल्‍याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मडगाव सत्र न्‍यायालयात अर्ज केला असून दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांच्‍यासमोर शनिवारी हा अर्ज सुनावणीस येणार आहे. यापूर्वी, याच प्रकरणातील फरार आरोपी अमोघ नाईक याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्‍या. पाॅल यांनी फेटाळून लावला होता.

Most Wanted Vally Dicosta
Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

कंडक्टर ते गँगस्टर

वॅली डिकोस्ता हा एकेकाळी साधा कंडक्टर होता. मात्र हळूहळू तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला. सुरवातीला एका घरफोडीत त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो गोव्यातील (Goa) गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध झाला. ड्रग्स व्यवसायात त्याचा हात असून यापूर्वी त्याला दोनवेळा अटक करण्यात आली आहे. अन्वर खुनी हल्ला प्रकरणातही त्याचा हात होता. दक्षिण गोव्यात त्याचा दबदबा असून सुपारी घेऊन गेम करणे यात त्याचा हातखंडा आहे. वॅलीचा बिश्नोई गँगकडेही संबंध असल्याचे सांगितले जाते.

१२ ऑगस्ट रोजीची घटना

१२ ऑगस्‍ट रोजी मुंगूल येथे हे टोळीयुद्धाची घटना घडली होती. राज्यभर ही घटना गाजली. वॅली आणि अमोघच्‍या इशाऱ्यावर त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी वॉल्‍टर गँगच्‍या युवकेश सिंग व रफीक तैशान या दाेघांवर जीवघेणा हल्‍ला केला होता. दक्षिण गोव्‍यातील गुन्‍हेगारीवर आपले वर्चस्‍व प्रस्‍थापीत करण्‍यासाठी हा हल्‍ला केला होता. या टोळीयुद्धात कुख्‍यात गँगस्‍टर लॉरेन्‍स विष्‍णाेई याचेही कनेक्‍शन उघड झाल्‍याने या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढले होते.

Most Wanted Vally Dicosta
Mungul Gangwar: मुंगूल हल्ला प्रकरणी अजून दोघांना अटक, एकजण बिश्नोई गँगचा सदस्य; Video

आतापर्यंत २५ जणांना अटक

आतापर्यंत या प्रकरणात २५ जणांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्‍या अमोघ आणि वॅली या दोघांच्‍या विरोधात फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली आहे. वॅली याच्‍या तिळामळ-केपे येथील घरावर पोलिसानी छापा टाकला होता. मात्र तो तिथे सापडू शकला नव्‍हता. वॅली याच्‍यावर अनेक गुन्‍हे नोंद असून गोव्‍यातील ड्रग्‍स व्‍यवसायातही त्‍याचा हात असल्‍याने यापूर्वी त्‍याला अटकही झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com