

पणजी: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (एमपीए) जमिनीवरील वादग्रस्त ‘मुरगावचा राजा’ शेडचे पाडकाम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आली. पाडकाम पूर्ण झाल्याबाबतचा अहवाल आणि वस्तुस्थिती स्पष्ट करत नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
घटनास्थळी बॅरिकेड्स लावण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर १० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती ‘एमपीए’ने न्यायालयात दिली आली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सुनावणीदरम्यान ‘एमपीए’ने न्यायालयाला सांगितले की, नगरपालिकेने या संरचनेचे पाडकाम पूर्ण केले आहे. मात्र, ७ ऑक्टोबर रोजी जेव्हा अधिकारी घटनास्थळी ताबा घेण्यासाठी आणि बॅरिकेड्स उभारण्यासाठी गेले, तेव्हा सुमारे दहाजणांच्या जमावाने अधिकाऱ्यांवर हल्ला केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत न्यायालयाने म्हटले की, या न्यायालयाच्या पाडकामाच्या आदेशाचा अर्थ असा नव्हे की, मुख्य अधिकाऱ्यांनी तो पाडावा आणि इतरांनी येऊन आमच्या आदेशात हस्तक्षेप करावा. हा न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत आणलेला अडथळा आहे. अशाप्रकारे चालल्यास न्यायालयाच्या आदेशाची कधीही योग्य अंमलबजावणी होऊ शकणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.