

पणजी: नियमित फीडर सेवा बंद पडल्याने मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक संकटात सापडली आहे. पायाभूत सुविधांतील त्रुटी, मोबाईल क्रेनमध्ये वारंवार बिघाड आणि प्रक्रियात्मक विलंबामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
सेवा नसल्याने गोव्यातील औषधनिर्मिती, अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना माल रस्तेमार्गे मुंबईतील जेएनपीटीकडे पाठवावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि महामार्गावरील कोंडी वाढली आहे.
कंटेनर वाहतूक सुरळीत करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (जीसीसीआय) व्हीजीएफ योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मुरगाव बंदर प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. पुरेसा माल नसल्याने जहाज कंपन्या सेवा सुरू करत नाहीत आणि सेवा नसल्याने माल समुद्रमार्गे येत नाही, अशा कोंडीत बंदर सापडले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.