मुरगाव पालिका हद्दीत वाढता कचरा बनला नागरिकांची डोकेदुखी

''वीज ट्रान्सफॉर्म बनला धोक्याचा मुरगाव नगरपालिकेने लक्ष घालणे आवश्यक''
Garbage
GarbageDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वीज खात्याच्या ट्रान्सफॉर्मजवळ कचरा टाकत असल्याने वीज कर्मचाऱ्यांना त्याठीकाणी काम करणे अडगळीचे तसेच धोक्याचे बनत असून विद्युत विभागाच्या अधिका-यांनी मुरगाव नगरपालिकेला ट्रान्सफॉर्मरजवळ स्वच्छता राखण्याची विनंती केली आहे. मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्स यांना कचरा काढणाऱ्यांना ताबडतोब परिसर साफ करण्याचे निर्देश देणार असल्याचे वीज खात्याला आश्वासन दिले. ( Mormugao municipality; Growing garbage became a headache for the citizens )

Garbage
प्रमोद सावंत सरकारने गोमंतकीयांसमोर मांडला 100 दिवसांचा लेखाजोखा; वाचा सविस्तर

मुरगाव पालिका हद्दीत वाढता कचरा लोकांची डोकेदुखी बनली असून मुख्य रस्ता अथवा सर्वत्र कचरा एके कचरा म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नजर मारेल तिथे कचरा उघड्यावर टाकलेला दुष्टीपथास पडतो. यावर पालिका ताबा ठेवण्यास असमर्थ ठरली आहे. कारण चालत्या गाडीतून कधी कचरा रस्त्याच्या कडेला फेकला जातो हे कुणालाच ठाऊक नसते.

Garbage
कस्टोडीयन प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणार- मुख्यमंत्री सावंत

या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी वीज खात्याचे वीज ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्या बरोबर पायथ्यांशी कचरा टाकला जातो. त्यामुळे वीज कर्मचा-यांना आपत्कालीन परिस्थितीत याठीकाणी उभे राहून काम करणे अडगळीचे तसेच धोक्याचे बनले आहे. एखादा वीज कर्मचारी त्या कचऱ्यात राहून किती वेळ काम करणार, कारण एक एक ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम तीन ते चार तास किंवा त्याहून अधिक तास संपत नाही. तेव्हा त्यांना नाईलाजास्तव कचऱ्यात राहून काम करावे लागते.

दरम्यान विज विभागाचे अभियंते संजीव म्हाळसेकर यांनी मुरगाव पालिकेला वीज ट्रान्सफॉर्मरजवळ स्वच्छता राखण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. प्राधान्याने परिसर स्वच्छ न केल्यास कर्मचारी आपत्कालिक परिस्थितीत उपस्थित राहून काम करू शकणार नाहीत. दरम्यान नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्स यांनी कचरा उचल करणाऱ्यांना ताबडतोब परिसर साफ करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन वीज खात्याला दिले. आणि कचरा कंत्राट दाराला उघड्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांकडून दंड आकारण्याचे फर्मान सोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com