Morjim News : साची यांनी नृत्यकलाकार घडवावेत : नाईक

Morjim News : वेगवेगळ्या कार्यशाळा घ्याव्यात, वर्ग सुरू करावेत. त्यासाठी मांद्रे पंचायत सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मांद्रेचे सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनी दिली.
Morjim
MorjimDainik Gomantak

Morjim News :

मोरजी, मांद्रेची तारका साची सावंत यांनी ज्या पद्धतीने आपले नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले, त्याच धर्तीवर माद्रे भागातील बालकलाकारांना नृत्याचे धडे देत असतानाच त्यांनाही चमकवण्यासाठी प्रयत्न करावेत.

वेगवेगळ्या कार्यशाळा घ्याव्यात, वर्ग सुरू करावेत. त्यासाठी मांद्रे पंचायत सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मांद्रेचे सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनी दिली.

सावंतवाडा-मांद्रे येथील नृत्यांगना साची सावंत यांनी साची डान्स अकॅडमीमार्फत नुकतीच बालकलाकारांसाठी तीन दिवस नृत्याची कार्यशाळा मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आयोजित केली होती. त्या समारोपच्या सत्राला प्रमुख पाहुणे या नात्याने मांद्रेचे सरपंच नाईक बोलत होते.

Morjim
Goa Congress: लोकसभा उमेदवार घोषणेनंतर गोवा काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; भिके, सार्दिन नाराज

यावेळी उपसरपंच तारा हडफडकर, पंचसदस्य चेतना पेडणेकर, पंचसदस्य राजेश मांद्रेकर, ज्येष्ठ नागरिक शिवा सावंत, नृत्यांगना साची सावंत, सपना सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. निशा चारी यांनी स्वागत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

यावेळी एकूण ३० बालनृत्य कलाकारांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत नृत्याचे विविध प्रकार कलाकारांनी अवगत केले. यावेळी प्रत्येक सहभागी नृत्य प्रशिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com