Morjim: ‘नो पार्किंग झोन’मध्येच वाहनांची गर्दी; मोरजी पंचायत क्षेत्रात नियमांची ऐशीतैशी

Traffic In Morjim: मोरजी पंचायत क्षेत्रातही यंदाच्या पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटन आले आहेत.
Morjim: ‘नो पार्किंग झोन’मध्येच वाहनांची गर्दी; मोरजी पंचायत क्षेत्रात नियमांची ऐशीतैशी
Morjim Parking Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी देश-विदेशातून पर्यटक भाडेपट्टीवरील वाहने घेऊन मोरजीतील किनारी भागात येत आहेत; परंतु अनेक ठिकाणी पार्किंगची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. येथील न्यूवाडा, विठ्ठलदास वाडा किनारी भागात पंचायत मंडळाने ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावले आहेत.

मात्र, या फलकांकडे दुर्लक्ष करत दर दिवशी येथे वाहने उभी केली जात आहेत. यावर वाहतूक खाते आणि पेडणे पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

मोरजी पंचायत क्षेत्राला तब्बल तीन किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर वर्षाचे ३६५ ही दिवस देश-विदेशातील पर्यटक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. मोरजी पंचायत क्षेत्रातही यंदाच्या पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटन आले आहेत.

Morjim: ‘नो पार्किंग झोन’मध्येच वाहनांची गर्दी; मोरजी पंचायत क्षेत्रात नियमांची ऐशीतैशी
Bicholim Mining: अडवलपाल आणखी एका खाणीच्या छायेत; ग्रामस्थांत धास्ती

येथील काही रिसॉर्ट मालकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय केली आहे. परंतु काही ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला जी रिसॉर्ट आहेत, त्यांच्याकडे कसल्याच प्रकारची पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांचे ग्राहक मिळेल तिथे वाहने पार्क करून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

किनाऱ्यावर वाहनांची वर्दळ

किनारी भागात वाहने नेण्यास मनाई आहे. तरीही काही पर्यटक, जे भाड्याची वाहने घेऊन किनारी भागात येतात, ती ही वाहने कुठेही पार्क करतात. काही वाहने थेट किनाऱ्यावरच उभी करण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. सध्या किनारी भागात फेरफटका मारला तर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक वाहने घेऊन फिरताना दिसतात. हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी केली जात आहे.

आस्थापनांनी पुढाकार घ्यावा

मोरजीत किनारी भागात किंवा मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालक आपली वाहने कुठेही पार्क करून ठेवतात. परिणामी वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. यावर सरकारने आणि स्थानिक पंचायतीने उपाययोजना करायला हवी. जे कोणी रस्त्याच्या बाजूला बांधकामे करून रिसॉर्ट, हॉटेल, दुकाने उभारतात, त्यांना पार्किंगची सोय करण्याची सूचना करावी, अशी मागणी समीर शेट्ये यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com