मोरजी : मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकर यांनी अपेक्षेनुसार 10 रोजी आपल्या यजमान मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर यांच्यासहित पंचायत मंडळासोबत भाजपात प्रवेश करून आमदार दयानंद सोपटे यांना विजयी करण्याचा निर्धार केला.
10 रोजी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोरजी पंचायत क्षेत्रातील घरोघरी प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच तुषार शेटगावकर, पंच मुकेश गडेकर, पंच विलास मोरजे, पंच सुप्रिया पोके, पंच प्रकाश शिरोडकर आणि मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर यांनी भाजपात प्रवेश केला.
प्रवेश कार्यक्रमाला आमदार दयानंद सोपटे, मांद्रे मतदार संघ भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर, भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, भाजपा महिला नेत्या डॉक्टर शीतल नाईक, मांद्रे महिला अध्यक्षा दीपा तळकर, अनिशा केरकर, नयनी शेटगावकर, तारा हडफडकर, पंच ममता सातार्डेकर, दीपश्री सोपटे, पार्से सरपंच प्रगती सोपटे, तुये माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, माजी सरपंच अनंत गडेकर ,तुये सरपंच सुहास नाईक, माजी सरपंच मंदार पोके. पेडणे नगराध्यक्षा उषा नागवेकर आदी उपस्थित होते.
नयनी शेटगावकर यांनी स्वागत केले.
सरपंच (Sarpanch) वैशाली शेटगावकर यांनी बोलताना आपण आज ऑफिशियली भाजपात प्रवेश केला. आपल्यावर यापूर्वी दररोज आरोप होत होता आपण सोपटेचे समर्थक आणि सोपटे म्हणत होता तू काकीचे समर्थक पण कोणीच म्हणत नव्हते कि सरपंच हि कॉंग्रेसची समर्थक म्हणून आता काकी नको, आणि यापूर्वी आपण कॉंग्रेसला प्रामाणिक काम केले. मागच्या निवडणुकीत (Election) आम्हाला पक्षाने कसलीच जबाबदारी दिली नाही. आपल्यावर आरोप होत होता त्यावेळी आपण सोपटे याना पाठींबा दिला. आता कॉंग्रेस (Congress) पक्षाला ग्रहण लागले आहे. कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होतो, तेव्हा नेते कुठेच नसतात असतात ते मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्ये. आता आपल्यासोबत आपले समर्थक आपल्यासोबत आहेत तेही भाजपात असणार,असे सांगितले
तरच भाजपात (BJP) प्रवेश ....
मुलांची कामे आणि विकास होत असेल तर आपण भाजपात प्रवेश करीन असे आपण आमदार दयानंद सोपटे याना शब्द दिला होता, त्यानुसार आमदार (MLA) दयानंद सोपटे यांनी विकास कामाबरोबरच बेरोजगार युवकाना रोजगार देण्याचे काम केले. त्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी एका घरात तीन तीन सरकारी नोकऱ्या
सरपंच वैशाली शेटगावकर यांनी पुढे बोलताना यापूर्वीचे या मतदार संघातून निवडून आलेले आमदार हे मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री (CM) झाले, त्यांनी केवळ एका घरात तीन तीन सरकारी नोकऱ्या देण्याचे काम केले, त्याबद्दल नाराजी व्यक्त करून आमदार सोपटे यांनी गरज ओळखून सरकारी नोकऱ्या त्यामुळेच मी भाजपाकडे गेल्याचे तिने सांगितले.
केंद्रातील निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने आहे आणि भविष्यातही भाजपा शिवाय राज्याला पर्याय नसल्याचा दावा सरपंच वैशाली शेटगावकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.