Morjim News : ‘तो’ खड्डा ठरू शकतो जीवघेणा! दीपक कळंगुटकर

Morjim News : तुये वीज केंद्रासमोरील रस्ता हॉटमिक्स करावा
Morjim
MorjimDainik Gomantak

Morjim News :

मोरजी, तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना आगरवाडा-चोपडे व्हाया पार्से, तुये ते पेडणेपर्यंतचे रस्ता रुंदीकरण चांगल्याप्रकारे केले होते. परंतु हेच रस्ते आता धोकादायक स्थितीत आहेत.

सध्या तुये येथील वीज विभागीय केंद्राच्या समोर असलेल्या रस्त्यावरील खड्डा कुणासाठी तरी जीवघेणा ठरू शकतो. त्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण करावे, अशी मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी केली आहे.

दीपक कळंगुटकर यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पार्से येथील स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून पार्से येथील रस्त्याचे रुंदीकरण केले होते. शिवाय चोपडे व्हाया पार्से, तुये ते पेडणे शहरापर्यंत हा एक मुख्य रस्ता तयार झाला होता; परंतु सध्या या रस्त्याची स्थिती बघितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभाग किती जागृत आहे, हे दिसून येते.

Morjim
Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

या रस्त्याच्या बाजूला गेल्या पावसाळ्यातच भूमिगत वीज केबल घालण्याचे काम केले होते; परंतु त्या रस्त्यांवर अजूनही व्यवस्थित हॉटमिक्स डांबरीकरण केले गेले नाही. त्याचा त्रास सध्या मोठ्या प्रमाणात जनतेला भोगावा लागत आहे.

ठिकठिकाणी अपघात होऊन अनेकजण जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तरीही सरकारला जाग कशी का येत नाही, असा सवाल दीपक कळंगुटकर यांनी केला.

मांद्रे मतदारसंघातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वीज विभागाने आणि सरकारने शंभर कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला होता. त्यानुसार वीज खात्याने पेडणे, तुये, पार्से, चोपडे, मांद्रे या ठिकाणी भूमिगत वीजकेबल घालण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले होते. खोदकाम केलेल्या रस्त्यांचे जर वेळीच हॉटमिक्स डांबरीकरण केले असते, तर आज हे रस्ते धोकादायक बनले नसते.

- दीपक कळंगुटकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com