Mountain Harvest : डोंगर कापणी कोण रोखणार; स्वराज संस्था आक्रमक

Mountain Harvest : पोलिस कारवाई करत नसल्याचा दावा
Mountain Harvest
Mountain Harvest Dainik Gomantak

Mountain Harvest :

मोरजी, मांद्रे पोलिस स्थानकापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर तसेच स्थानकांच्या इमारती बाहेरून दिसणारी डोंगर कापणी विरोधात तक्रार देऊनही कारवाई करण्यास मांद्रे पोलिस कुचकामी ठरल्याचा आरोप मांद्रे स्वराज संस्थेने केला आहे.

स्वराज संस्थेने जारी केलेल्या पत्रकानुसार, जुनसवाडा येथील डोंगरमाथ्यावर होणारी डोंगर कापणी थांबवावी तसेच हा डोंगर सुरक्षित राहावा यासाठी स्वराज संस्था गेले वर्षभर वावरत आहे.

गेल्या आक्टोबरमध्ये या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर काम बंद होते. परंतु मार्चपासून पुन्हा डोंगर कापणी सुरू झाली होती, त्यासंदर्भात रीतसर लेखी तक्रार

दिली होती.

दरम्यान, ५ मे रोजी तक्रारदार प्रसाद शहापूरकर यांनी याबाबत मांद्रे पोलिसांना माहिती दिली. मात्र अजून कोणती कारवाई झालेली नाही. मांद्रे पंचायतीने काम बंद ठेवण्याचा आदेश संबंधितांना दिला आहे.

सरपंचांनी घेतली पोलिस उपनिरीक्षकांशी भेट

काम बंद ठेवण्याचा आदेश मांद्रे पंचायतीने दिला असतानाही काम सुरूच आहे. यासंदर्भात सरपंच प्रशांत नाईक यांनी मांद्रे पोलिस स्थानकात जाऊन उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली.

मात्र उपनिरीक्षक अनिल पोळेकर यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही. उलट सरपंच व तक्रारदाराला अर्धातास बसवून ठेवले. त्यानंतर अर्ज लिहून घेतला व जागेची पाहणी करण्याकरिता दोघा पोलिसांना पाठवले. परंतु हे पोलिस कोणतीच कारवाई करू शकले नाही, असे सरपंच नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com