VIDEO: वकिलासह भाटकारावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक; मांद्रेत 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, कट पूर्वनियोजित असल्याचा दावा

Advocate Ankur Kumar Attack Goa: बेकायदेशीर रिसॉर्टच्या पाडकामाची पाहणी व कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत गेलेले अ‍ॅड. अंकुर कुमार आणि त्यांचे अशील अनिल प्रभाकर नाईक यांच्यावर ८ ते १० जणांच्या टोळीने लोखंडी सळ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला.
Advocate Ankur Kumar Attack Goa
Advocate Ankur Kumar Attack GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/मोरजी: गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोरजीतील बेकायदेशीर रिसॉर्टच्या पाडकामाची पाहणी व कारवाईसाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत गेलेले अ‍ॅड. अंकुर कुमार आणि त्यांचे अशील अनिल प्रभाकर नाईक यांच्यावर ८ ते १० जणांच्या टोळीने लोखंडी सळ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला.

याप्रकरणी पोलिसांनी ध्रुव दिलीप उर्फ लोशन मोर्जे (वय ३० वर्षे) आणि दिलीप उर्फ लोशन मंगेश मोर्जे (वय ५५ वर्षे) यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या हल्ल्यात अ‍ॅड. कुमार गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता, असा आरोप ॲड. कुमार यांनी केला आहे. कुमार यांनी सांगितले की, मोरजी येथील एका बेकायदेशीर रिसॉर्टच्या बांधकामाबाबत ''जीसीझेडएमए''ने पाडकामाचे आदेश जारी केले होते.

या आदेशाविरोधात प्रतिवादींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ११ जून रोजी झालेल्या सुनावणीत पाडकामाचा आदेश कायम ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका दाखल केली.

यावर अत्यंत गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने ८ जुलै रोजी निर्देश जारी केले आणि ''जीसीझेडएमए''ला बेकायदेशीर पाडकामाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. म्हापसा ॲडव्होकेट्स फोरमने ॲड. अंकुर कुमार यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

उच्च न्यायालयाला या कारवाईचा अंमलबजावणी अहवाल सादर करायचा असल्याने, ''जीसीझेडएमए''च्या अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. कुमार यांना १६ जुलै रोजी कार्यालयात बोलावून कायदेशीर मदत व अहवाल तयार करण्यासाठी सहकार्य मागितले होते. त्यानुसार १७ जुलै रोजी पोलिस बंदोबस्तात पाडकामाची पाहणी व कारवाई निश्चित केली होती. घटनास्थळी ''जीसीझेडएमए''चे अधिकारी, स्थानिक तलाठी, मोरजी ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Advocate Ankur Kumar Attack Goa
'Goa Bird Checklist'मध्ये नव्या प्रजातींची नोंद; पाच नव्या पक्ष्यांचा समावेश, इंडियन बड्‌र्सच्या शोधपत्रिकेतील अहवाल प्रसिद्ध

म्हणे, सर्व अधिकारी माझ्या ‘पेरोल’वर

या हल्ल्यादरम्यान मुख्य संशयित दिलीप मोर्जे याने थेट धमकी दिल्याचे अ‍ॅड. कुमार यांनी सांगितले. तुला आधीच बजावले होते, की ही केस घेऊ नकोस. सर्व सरकारी अधिकारी माझ्या ‘पेरोल’वर आहेत असे देखील त्‍यांनी सांगितल्‍याचे कुमार यांनी स्‍पष्‍ट केले.

...तर मी जीवंत राहिलो नसतो

अ‍ॅड. कुमार यांनी सांगितले की, आम्ही तिथे पोहोचताच दिलीप मोर्जे आणि त्यांच्या ८ ते १० साथीदारांनी लोखंडी सळ्या व दगड घेऊन हल्ला चढवला. त्यांनी माझी गाडी अडवून रस्ता ब्लॉक केला आणि काहीजण थेट गाडीच्या टपावर व बॉनेटवर चढले. गाडीत माझ्यासोबत माझे ७४ वर्षीय अशील देखील बसले होते. हल्लेखोरांनी गाडीवर प्रचंड दगडफेक करून काचा फोडल्या. सुदैवाने मी गाडीबाहेर पडलो नाही. जर बाहेर आलो असतो तर मला जीवंत सोडले नसते.

Advocate Ankur Kumar Attack Goa
Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

अ‍ॅड. अंकुर कुमार यांच्यावरील जीवघेणा हल्ला निषेधार्ह आहे. बार असोसिएशन या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वतःहून गुन्ह्याची दखल घ्यावी, अशी विनंती करणारे औपचारिक पत्र बार असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयाला पाठवले जाईल. - जे. ई. कुएल्हो परेरा, अध्यक्ष, गोवा हायकोर्ट बार असोसिएशन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com