

मोरजी: मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत मोरजी येथील बांदेकरवाडा परिसरातील गेस्ट हाऊसवर छापा टाकून दोन सेनेगाली नागरिकांसह तिघांना अटक केली. या कारवाईत २२२.९२ ग्रॅम वजनाचा कोकेनसदृश पांढऱ्या रंगाचा पावडरसदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत २२ लाख २९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये सेनेगलचा नागरिक बौबा सांबा (३१) याच्यासह अलिऊ मुस्ताफा (३१) यांचा समावेश आहे. दोघेही बांदेकरवाडा, मोरजी येथील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्या ताब्यात पांढऱ्या रंगाचा पावडरसदृश पदार्थ आढळून आला.
या अमली पदार्थासोबतच पोलिसांनी १० लाख ८५ हजार ३०० रुपयांची रोकड आणि अन्य साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३३ लाख १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले. तिघांना २३ ऑगस्ट रोजी पहाटे २.५० वाजता अटक करण्यात आली.
अमली पदार्थ कोठून आणण्यात आले, त्याची विक्री अथवा वितरण कोणाला केले जाणार होते, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि जप्त रोकडचा अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तपासातून धागेदोरे उलगडणार?
अमली पदार्थांचा साठा नेमका कोठून आणण्यात आला, त्याची विक्री अथवा वितरण कोणाला केले जाणार होते, या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि जप्त करण्यात आलेल्या रोकडचा अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.