मोरजी Morjim : गोव्याच्या चाळीस मंतदारसंघापैकी केवळ आपण व आपला मतदारसंघ नोकऱ्या (job) देऊ शकतो आणखी कुणालाच ते शक्य नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी केला. कुमयाचा-व्हाळ तोरसे पत्रादेवी येथील जलसिंचन खात्याअंतर्गत तळीच्या बांधकामास प्रारंभ केल्यानंतर आजगावकर बोलत होते. यावेळी सरपंच (Sarpanch) उत्तम वीर, माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, अशोक सावळ, बबन देसौझा, पंच प्रार्थना मोटे, चांदेलचे सरपंच संतोष मळीक, माजी सरपंच प्रदीप कांबळी उपस्थित होते.
आजगावकर म्हणाले, विकासाला साथ देताना जे-जे आम्ही पेडणे मतदारसंघात प्रकल्प आणलेले आहे, त्यात पेडणेवासीयांचा मोठा त्याग आहे. त्या त्यागाचे प्रतीक म्हणून हे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्या प्रकल्पाची फळे आता या मतदारसंघातील मुलांना नोकरीच्या माध्यमातून मिळायला हवी म्हणूनच आता संघटित होऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळात आपणास निवडून द्यावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले.
मी कुठे कमी पडलो ते सांगा
उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी नागरिकांच्या काळजाला हात घालताना आपण तुमचा सेवक आणि नोकर आहे. तुमच्यामुळे आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री बनलो. तुम्ही कामे सांगितली ती कामे आपण पूर्ण केली. आपण कोणती कामे केली नाही आणि करायची आहे किंवा आपण कमी कुठे पडलो ते सांगावे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत काही उमेदवार ड्रग्स व्यवहारातून पैसा मतदारांना देत आहेत, असा आरोप केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.