Morjim Crime: 'पोलिस नक्की कुणाला संरक्षण देतात'? मोरजी खून प्रकरण; आप, कूळ-मुंडकार मुख्य संशयिताच्या अटकेसाठी आक्रमक

Morjim Murder: वरचावाडा-मोरजी येथील उमाकांत खोत यांनी बेकायदेशीर डोंगर कापणी, बेकायदेशीर रस्ता करणे याविरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.
Morjim Crime
Morjim CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: वरचावाडा-मोरजी येथील उमाकांत खोत यांनी बेकायदेशीर डोंगर कापणी, बेकायदेशीर रस्ता करणे याविरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची नोंद ज्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यांच्यावर तसेच जो जमीनमालक आहे, ज्याने जमीन विकत घेतलेली आहे आणि उमाकांत खोत यांच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्वरित अटक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने मांद्रे पोलिसांना लेखी निवेदन देऊन केली.

यावेळी ‘आप’चे प्रवक्ते वाल्मिकी नाईक, गोवा उपाध्यक्ष सुनील सिग्नापूरकर, मांद्रे ‘आप’च्या महिला अध्यक्ष सुवर्णा हरमलकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, सचिन घाटवळ, नामदेव तुळसकर, विशाल घाटवळ आदी उपस्थित होते.

दरम्यान, मोरजीतील खून प्रकरणामुळे परिसर हादरून गेलेला आहे. एखादी व्यक्ती आपल्या जमिनीत बेकायदेशीरपणे काम सुरू असल्याची तक्रार करते आणि त्याच जमिनीमध्ये त्यांना मारहाण करून खून केला जातो, ही घटना अत्यंत निर्दयी आहे.

कुळाची जमीन वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. उमाकांत खोत यांच्या रूपाने आता सर्व गोमंतकीय जमीनदारांनी, कूळ-मुंडकारांने संघटित होऊन आपापल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रित येण्याची गरज असल्याचे ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले.

सुवर्णा हरमलकर आणि सुनील सिग्नापूरकर यांनी सांगितले की, आम्ही गोव्यात सुरक्षित नाही. ही बिल्डर लॉबी दिल्लीहून आलेली आहे. ते बेकायदेशीरपणे जमिनी विकत घेत आहेत. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. गोव्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे.

दरम्यान, मोरजीतील कूळ-मुंडकार असलेले उमाकांत खोत यांचा बिगरगोमंतकीयांकडून झालेल्या मारहाणीतून मृत्यू झाला. त्या संशयितांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन छेडू. अशाप्रकारचा इशारा देत कूळ-मुंडकार संघटनेनेही मांद्रे पोलिसांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले. यावेळी कूळ-मुंडकार संघटनेचे दीपेश नाईक, संजय बर्डे, भास्कर नारुलकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, दीपेश नाईक यांनी उमाकांत खोत यांचा खून करण्यात आला आहे. कूळ-मुंडकार कायदा काय सांगतो, याची माहिती सरकारला नाही का, असा सवाल केला.

‘कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर’ असे असताना कुळाच्या जमिनी परस्पर अशोक कुमारसारख्या दिल्लीवाल्यांना विकण्याचा घाट घातला त्यावर कारवाई का केली नाही. संशयितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. नो डेव्हलपमेंट झोनमध्ये विकासाची कामे कशी केली जातात आणि ती दिल्लीवाले का करतात, असा सवालही यावेळी दीपेश नाईक यांनी केला.

यावेळी भास्कर नारुलकर यांनी उमाकांत खोत यांचा खून करण्यात आलेला आहे. जे कोणी संशयित आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली.

Morjim Crime
Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

पोलिसांकडून नक्की कुणाला संरक्षण?

कूळ-मुंडकारांची जमीन विकण्याचा अधिकार सरकारने कसा काय दिला. खोत यांनी आपल्या जमिनीमध्ये बेकायदेशीर रस्ते, डोंगर कापणी सुरू असल्याची तक्रार सरकारी खात्यांना निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल का घेतली नाही तसेच अशाप्रकारे माणसांना जिवंत मारण्याच्या घटना घडताना मग पोलिस कुणासाठी आहेत.

तसेच पोलिस या प्रकरणा नक्की कुणाला संरक्षण देतात, असा सवाल यावेळी संजय बर्डे यांनी केला. तसेच सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात आयपीएस अधिकारी येतात ते गोवेकरांच्या सुरक्षेसाठी नाहीत, तर ते दिल्लीवाल्यांच्या लॉबीसाठी सेवा देत असल्याचा दावाही यावेळी संजय बर्डे यांनी केला.

Morjim Crime
Morjim: सावधान! गोव्यातील 'या' रस्त्यावर गाडी लावल्यास होणार कारवाई; स्थानिकांना पार्किंग सोय करणे बंधनकारक

तक्रारींमुळेच खोत यांचा खून!

‘आप’चे वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, उमाकांत खोत यांनी बेकायदेशीर डोंगरकापणी आणि इतर कामांविषयी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींमुळेच त्यांचा खून करण्यात आला. उमाकांत खोत यांना मारण्याचे निर्देश ज्याने दिले, त्या मुख्य संशयिताला मांद्रेे पोलिसांनी अटक करायला हवी. उमाकांत खोत यांची जमीन ज्यांनी परस्पर विकली त्यांनाही ताब्यात घेण्याची गरज आहे. कुळाच्या संमतीशिवाय ती जमीन विकलीच कशी, अशाप्रकारची चौकशी सरकारने करावी. मजुरांना आणून त्यांच्यावर कारवाई करणे आणि मुख्य संशयितांना मोकळीक देणे. हे आम्ही सहन करणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com