जास्तीत जास्त वापर होऊनही यंदा चापोली धरणात अधिक जलसाठा

गेल्या वर्षापेक्षा काणकोणात पाणी वापर क्षमता वाढलेली आहे.
Chapoli Dam
Chapoli DamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

काणकोण: काणकोणची तहान भागविणाऱ्या चापोली धरणात गेल्या वर्षापेक्षा यंदा जास्त जलसाठा आहे. गेल्यावर्षी चापोली धरण जलाशयात 32.59 आरएलडी जलसाठा होता, तर यंदा आजपर्यंत (ता. 17) 32.89 आरएलडी जलसाठा उपलब्ध आहे. धरण जलाशयात उच्चतम जलसाठा क्षमता 38.49 आरएलडी आहे. गेल्या वर्षापेक्षा काणकोणात पाणी वापर क्षमता वाढलेली आहे. यंदा चापोली धरणाचे पाणी लोलये पंचायत क्षेत्रातील अंतर्गत भागापर्यंत जलवाहिनी कार्यान्वित करून पोचविण्यात आले आहे. त्याशिवाय जलाशयातून पाणी उपसा करण्यासाठी जास्त क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत, तरीही यंदा धरणात अधिक जलसाठा आहे. गेल्यावर्षी 16 मे रोजी वादळी पावसाने हजेरी लावली होती. एकाच दिवशी सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाली होती, असे जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्यांनी सांगितले.

काणकोणात यंदा पाणीपुरवठा समाधानकारक असला तरी गावडोंगरी, खोतीगाव या भागात दरवर्षीप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, लोलये, पैंगीण पंचायत क्षेत्रातील काही भागांना टॅकरपासून मुक्ती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com