Driving License Suspended in Goa
Driving License Suspended in GoaDainik Gomantak

मडगावात 2000 हून अधिक ड्रायव्हिंग लायसन्स निलंबीत

Driving License Suspended in Goa : सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत अनिवार्य केलेल्या भरघोस दंडानेही वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही.
Published on

Driving License Suspended in Goa : सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत अनिवार्य केलेल्या भरघोस दंडानेही वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे थांबवले नाही. कारण मडगाव आणि आसपासच्या भागातील 2,000 हून अधिक लोकांना किमान तीन महिन्यांच्या कालावधीसाठी त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबीत करण्यात आले आहे.

Driving License Suspended in Goa
गोव्यात प्रत्येक तालुक्यात महिलांच्या सुरक्षेसाठी संपर्क केंद्र उभारावी: बायलांचो साद

माहितीनुसार, वाहतूक गुन्ह्यांमध्ये ओव्हरस्पीडिंग, मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर अशा इ गोष्टींचा समावेश आहे.

दरम्यान, यावर्षी गेल्या 5 महिन्यांत हेल्मेट न वापरल्याप्रकरणी 77,819 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रतिदिन 500 हून अधिक विना हेल्मेटची प्रकरणे नोंद होत आहे.

वाहतूक पोलिस विभागाने राज्यात मोटार वाहन कायद्याखाली असलेल्या सुमारे 54 विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अधिक तर प्रकरणे ही विना हेल्मेट (77,819), वाहनांच्या काळ्या काचा (31,394), गाडी चालविताना चालक वा सहचालकाने सीट बेल्ट न घालणे (34,573), नो एन्ट्री (21,308), नियमानुसार क्रमांक पट्टी न असणे (10,759), धोकादायक पार्किंग करणे (25,439) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com