Drunk Drive Case : गोव्यात दर वर्षाला १२००हून अधिक ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’प्रकरणे

Drunk Drive Case : रस्त्यावरील मरण झाले स्वस्त : बाणस्तारी, काणकोणनंतर आता वेर्णा येथे दारूच्या नशेत मोठा अपघात
Drink And Drive
Drink And Drive Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Drunk Drive Case :

मडगाव, वेर्णा येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने मजुरांच्या खोपट्यावर बस चाढविल्याने ४ मजुरांचा मृत्यू होण्याची घटना काल समोर आल्याने गोव्यातील ''ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'' प्रकरणे हा विषय ऐरणीवर आला आहे. गोव्यात दरवर्षी सरासरी १२०० ''ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'' प्रकरणे नोंद होत असल्याची माहिती पोलिस दफ्तरतून पुढे आली आहे.

२०२० ते २०२२ पर्यंतची आकडेवारी पाहिल्यास हे चित्र उभे होते. २०२० साली ''ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'' ची १६६० प्रकरणे नोंद झाली होती.

२०२१ मध्ये त्यात लक्षणीय घट होऊन हा आकडा केवळ २६६ वर पोहोचला मात्र २०२१ मध्ये त्यात पुन्हा प्रचंड वाढ होत १३७८ वर पोहोचली.

गोव्यात ''ड्रंक अँड ड्राईव्ह'' खाली सरासरी दर वर्षाला ६५० वाहन चालकांचे परवाने रद्द केले जात आहेत.

गोवा वैद्यकिय महाविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासात गोव्यात होणाऱ्या रस्ता अपघातांत १० टक्के प्रमाण ''ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'' मुळे असल्याची माहिती पुढे आली आहे.

हल्‍लीच्‍या काळातील दुर्घटना

कालचा ''ड्रंक अँड ड्राईव्ह'' मुळे झालेला अपघात हा अलीकडच्या काळातील तिसरा मोठा अपघात आहे. कालच्या अपघातात चार जणांचा प्राण गेला तर तीन गंभीर जखमी झाले.

यापूर्वी मागच्या वर्षी ६ ऑगस्ट रोजी बाणास्तारी पुलावर मद्यधुंद अवस्थेतील एका चालकाचा आपल्या गाडीवरील नियंत्रण गेल्याने तिघांचा अंत झाला होता.

या वर्षी १८ मार्च रोजी काणकोण जवळ घोडेवाळ येथे दारूच्या नशेत ट्रक चालवत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेल्याने ट्रक खाईत पडला होता. या अपघातात दोघांना मृत्यू आला, तर ११ जखमी झाले.

याशिवाय मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका अशाच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्या चालकाने वागातोर येथे आपली गाडी सरळ एका दुकानात घुसवल्याने एकाचा अंत झाला होता.

तीन वर्षापूर्वी एका एसयूव्ही गाडीचा झुवारी पुलाच्या कठड्याला धडक देऊन गाडी पाण्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. ही गाडी चालविणारी महिला चालक प्यालेल्या अवस्थेत होती, हे नंतर उघडकीस आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com